पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज कपरदिकेश्वर यात्रेनंतर यात्रा परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे व प्राचार्य अभय खंडागळे यांनी दिली.
कपरदिकेश्वर यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक भेट देतात यात्रा चैतन्यवेशीपासुन मंदिरापर्यंत भरते या परिसराचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवून सहा ट्रेलर एवढा कचरा स्वयंसेवकांनी यात्रा परिसरातून काढला. सदर स्वच्छता अभियान मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांबरोबरच ग्रामपंचायत ओतूर चे स्वच्छता कर्मचारी तसेच महाविद्यालयातील डॉ डी एम टिळेकर, डॉ. व्ही वाय गावडे, डॉ ए के लोंढे, डॉ आर एन कसपटे यांनी श्रमदान केले. सदर शिबिर स्वच्छता अभियान कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी लायन्स क्लब ओतूर चे विशेष सहकार्य लाभले. सदर स्वच्छता अभियान साठी ग्रामपंचायत ओतूरचे सदस्य श्री प्रशांत डुंबरे सौ छाया तांबे तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष डुंबरे महाविद्यालयाचे प्राचार्य अभय खंडागळे उपप्राचार्य डॉ व्ही एम शिंदे, डॉ एस एफ ढाकणे, डॉ के डी सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अमोल बिबे व डॉक्टर निलेश काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.