Survey : महापालिका ‘त्या’ बालकांचे करणार सर्वेक्षण

HomeपुणेPMC

Survey : महापालिका ‘त्या’ बालकांचे करणार सर्वेक्षण

Ganesh Kumar Mule Sep 22, 2021 1:32 PM

PMC Recruitment News Update | पुणे महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 26 हजार 420 अर्ज दाखल  | महापालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळेना 
Prithviraj Sutar : PMC: महानगरपालिकेत अत्यावश्यक सेवेसाठी कायमस्वरूपी M.B.B.S डॉक्टरची व ॲम्बुलन्सची व्यवस्था करा
2300 crore revenue to Pune Municipal Corporation from Building Permission development Charges

 आईवडील गमवलेल्या बालकांचे होणार सर्वेक्षण

: नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता

पुणे – कोरोनाच्या संसर्गामुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार  कृती गट तयार केला आहे. मुलांना आईवडील गमवावे लागले यासाठी बालकांचे सर्वेक्षण सुरू करावे अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी मुख्यसभेकडे केली होती. या प्रस्तावाला आज पुणेमहापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी मिळाली.

: सरकारच्या योजनेत समाविष्ट करावे

कोरोनामुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय टास्क फोर्स कार्यन्वित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या घरी प्रशासनामार्फत घरटी सर्वेक्षण कार्यवाही सध्या सुरू आहेत. त्या बालकांना भवितव्यासाठी त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे संरक्षण व संगोपन या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य शासनाने परिपत्रकानुसार दिलेल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबामध्ये दैनंदिन पैसे कमावून आणणारा कर्ता पुरुष गेल्यामुळे उर्वरित कुटुंबाची उपासमार होण्याची वेळ आली आहे.
उपरोक्त कार्यवाही अतिशय उल्लेखनीय असून त्याच धर्तीवर पुणे शहरातील ज्या बालकांनी अथवा ज्या कुटुंबानी त्यांच्या घरातील कर्ता पुरूष गमविला आहे अशा घरातील बालकांना या योजनेमध्ये समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यास मान्यता द्यावी, अशी मा. मुख्य सभेकडे केली होती त्याला आज मान्यता मिळाली.
मुख्य सभेने आमची मागणी मान्य केली. त्याबद्दल विशेष आनंद आहे. आता महापालिका प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी सरकारसोबत पाठपुरावा करावा. जेणेकरून या मुलांना न्याय मिळेल.

          अर्चना पाटील, नगरसेविका.