Sunil Shinde | RMS | आरएमएसचे अध्यक्ष सुनील शिंदे जागतिक मेळाव्याला करणार संबोधित
Sunil Shinde | RMS | आरएमएसचे अध्यक्ष सुनील शिंदे (RMS President Sunil Shinde) यांना अमेरिकेतील कामगार नेत्यांच्या जागतिक मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. (Sunil Shinde: RMS)
यूएनआय ग्लोबल युनियन (UNI Global Union), जगभरातील सुरक्षा, सेवा आणी अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या कामगारांची सर्वात मोठी जागतिक कामगार संघटना आहे. त्यांची सहावी जागतिक परिषद आयोजित करीत आहे. ही जागतिक परिषद रविवार, २७ ऑगस्ट ते बुधवार, ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत फिलाडेल्फिया, पेन्सिल्व्हेनिया, अमेरिकेतील फिलाडेल्फिया कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.
‘रायझिंग टुगेदर’ (Rising Together) या संकल्पनेखाली काँग्रेस जगभरातील दोन कोटी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कामगार संघटनांच्या नेत्यांना एकत्र आणून कामगारांची जागतिक ताकद निर्माण करेल आणि पुढील चार वर्षांचा कृती कार्यक्रम निश्चित करेल.
कामगार नेत्यांच्या या जागतिक मेळाव्यात १५० हून अधिक देशसहभागी होणार आहेत. या परिषदेच्या अजेंड्यात कॉर्पोरेट उत्तरदायित्व, आरोग्य आणि सुरक्षा, न्याय्य आणि सर्वसमावेशक जागतिक अर्थव्यवस्था, विषमता आणि भेदभाव आणि सर्वात शेवटी लोकशाही आणि मानवी हक्क या मुद्द्यांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये सिनेटर, अमेरिकेच्या कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आयएलओचे महासंचालक आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांचा ही सहभाग असेल.
राष्ट्रीय मजदूर संघाचे (आरएमएसचे) अध्यक्ष सुनील शिंदे यांना डिजिटल युगात कामाच स्वरूप आणि श्रम बाजाराचे बदलते चित्र आणि न्याय्य अर्थव्यवस्था या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शिंदे जागतिक उपस्थितांना प्लॅटफॉर्म आणि गिग इकॉनॉमीच्या वाढत्या क्षेत्रात भारतीय कामगारांसमोरील आव्हाने आणि लढ्याची माहिती देतील. ते जगभरातून सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना भेटतील आणि एकत्रितपणे यूएनआयचा पुढील 4 वर्षांचा अजेंडा तयार करतील.
——
News Title | Sunil Shinde | RMS | RMS President Sunil Shinde will address the global gathering