Sunil Shinde RMS | देशव्यापी सार्वत्रिक संपात राष्ट्रीय मजदूर संघाचे आंदोलन – कामगार नेते सुनिल शिंदे

HomeBreaking News

Sunil Shinde RMS | देशव्यापी सार्वत्रिक संपात राष्ट्रीय मजदूर संघाचे आंदोलन – कामगार नेते सुनिल शिंदे

Ganesh Kumar Mule Jul 09, 2025 8:51 PM

MLA Balasaheb Thorat | भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल |काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
Pune PMC News | समाविष्ट 9 गावांचा प्रारूप विकास आराखडा मंजूर | सरकारने मागवल्या हरकती आणि सूचना 
MP Muralidhar Mohol Office | खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या २४/७ कार्यालयाचे उद्घाटन | वर्षपूर्ती कार्याचा अहवाल प्रकाशन

Sunil Shinde RMS | देशव्यापी सार्वत्रिक संपात राष्ट्रीय मजदूर संघाचे आंदोलन – कामगार नेते सुनिल शिंदे

 

Pune News – (The Karbhari News Service) – कामगार विरोधी चार संहीता जन विरोधी कायदे‌ मागे घ्यावे उद्देशाने झालेल्या देशव्यापी सार्वत्रिक संपात राष्ट्रीय मजदूर संघाने मेळावा व निदर्शने करुन संपात सहभाग घेतला. या निमित्ताने संघटनेचे कार्यालय कॉंग्रेस भवन शिवाजीनगर येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा मेळावा घेण्यात आला यानंतर रॅली करत पुणे मनपा येथील कै.भाऊसाहेब बहीरट पाटील पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. (Pune News)

या निदर्शनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करा ,ग्रॅज्यूइटी लागू केली पाहिजे,मानधन नको वेतन हवे ,एक रक्कमी लाभ नको पेन्शन लागू केली पाहीजे अंगणवाडीची वाढवलेली वेळ कमी करा, पोषण ट्रॅकरमधील त्रूटीची सक्ती बंद करा , आहाराचा दर्जा सुधारला पाहीजे ,प्रोत्साहन भत्त्यात भरीव वाढ करा अशा विविध घोषणा देत पुणे शहरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आंदोलनात सहभागी झाले.

या मेळाव्यामधे व आंदोलनामधे कामगार नेते सुनिल शिंदे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत असून‌ कामगार संघटनेचा त्याला पूर्ण विरोध असल्याचे जाहीर केले त्याचबरोबर असंघटीत कामगार ,अंगणवाडी सेविका व मदतनीस या सर्वां साठी सरकारने ताबडतोब बैठक घेवून कामगारांचे प्रश्न सोडवावे असे आवाहन कामगार नेते सुनिल शिंदे यांनी केले. यावेळी अंगणवाडी सेविका गीतांजली थिटे ,वैशाली लांडगे ,अनिता सातपुते ,उज्वला शिंदे जयश्री जठार , सुजाता शेंडगे ,रंजना इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.यासोबत संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण , सरचिटणीस एस.के. पळसे ,संघटक विशाल बागूल , कामगार प्रतिनिधी जान्हवी दिघे संदिप पाटोळे‌ उपस्थित होते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: