Sunil Mane NCP – SCP | जात पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष! – सुनील माने यांच्या पाठपुराव्याला यश
Maharashtra News – (The Karbhari News Service) – जात पडताळणी समित्यांना अध्यक्ष नसल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरचिटणीस सुनील माने (Sunil Mane) यांनी अध्यक्ष नेमण्याबाबत पाठपुरावा केला होता. याला यश आले असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अध्यक्ष नेमले आहेत.
याबाबत सुनील माने यांनी सांगितले की, मी समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ तसेच या विभागाचे प्रधान सचिव डॅा. हर्षदीप कांबळे यांना पत्र लिहिले होते. तसेच डॅा. कांबळे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना या गंभीर विषयावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली होती. या भेटीत त्यांनी याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवण्याचे आश्वासन मला दिले होते. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया साहेबांनाही मी याबाबत भेटून पत्र दिले होते.
—-
माझ्या मागणीवरून सरकारने जात पडताळणी अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना बढती देऊन जात पडताळणी अध्यक्ष केले आहे. आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो.
– सुनील माने, प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता महाराष्ट्र राज्य. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार.
COMMENTS