खाते प्रमुखांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव सरकारला सादर
: पे मॅट्रिक्स एस 27 ची केली मागणी
: मुख्य अभियंता पदापेक्षा खाते प्रमुखाची जबाबदारी मोठी
: काय आहे प्रस्ताव
पुणे महानगरपालिका अधिकारी/सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करणेकामी सादर केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिका अधिकारी/सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करणेस मंजुरी दिली आहे. या मंजुरीमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी व मुख्य लेखापरीक्षक या पदाशी समकक्ष वैद्यकीय आरोग्य अधिकारी, विभागप्रमुख, महापालिका सहाय्यक आयुक्त व शिपाई या हुद्यांचे वेतन निश्चितीकरण कमी पे मॅट्रिक्समध्ये दर्शविण्यात आलेले आहेत. याशिवाय पुणे महानगरपालिकेमधील अभियांत्रिकी संवर्गात कार्यरत असलेल्या मुख्य अभियंता एस-२७, अधिक्षक अभियंता एस-२५, कार्यकारी अभियंता एस-२३ याप्रमाणे पे मॅट्रिक्स मंजुर केले आहेत.
पुणे महानगरपालिकामध्ये कार्यरत अभियांत्रिकी संवर्गातील मुख्य अभियंता पदास २७ पे मॅट्रिक्स शासनाने मंजूर केला आहे. तथापि या सर्व मुख्य अभियंता यांचेकडे महानगरपालिकेतील फक्त एका विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु सर्वच खातेप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे महानगरपालिकेच्या सर्व विभागांशी संपर्क साधून कामकाज करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात
आलेली आहे. असे असतानाही खातेप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेने मंजूर केलेला पे मॅट्रिक्स एस -२५ मंजूर न करता शासनाने एस- २३ पे मॅट्रिक्स मंजूर केला आहे. वास्तविक मुख्य अभियंता पदावरील अधिकाऱ्यांचे कामकाज हे खातेप्रमुख संवर्गातील अधिकाऱ्यांच्या तुलनेने एका विभागाशी सिमीत आहे.
(उदा. पथ विभागाकडील कार्यकारी अभियंता यांचेकडे एका विशिष्ट विभागाचे कार्यक्षेत्र सोपविण्यात आले आहे) तुलनेने खातेप्रमुख संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामकाज अतिव्याप्त व सर्व विभागांशी संबंधित आहे. खातेप्रमुख संवर्गातील अधिकाऱ्यांचे पे मॅट्रिक्स एस-२३ मंजुर केल्याने मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, इत्यादी विभागांच्या पदोन्नतीच्या साखळीमध्ये बाधा निर्माण झाली आहे. तसेच, महानगरपालिकेने निम्न संवर्गात सुचविलेल्या पदाचा पे मॅट्रिक्स खातेप्रमुख यांच्या समकक्ष झाल्याने प्रशासकीय संरचनेमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
नैसर्गिक न्यायतत्वाविरूध्द आहे. सबब वरील समर्थानासह नव्याने पे मॅट्रिक्स प्रस्तावित केला आहे. सबब उपरोक्त तपशिलामध्ये नमूद केलेल्या पदांना प्रस्तावित केल्यानुसार सुधारित पे मॅट्रिक्स मंजूर होणेस विनंती आहे.
COMMENTS