हुर्रे…! शाळा सुरु झाली..!
:विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद
: राष्ट्रवादीने विद्यार्थ्यांचे वाढवले मनोबल
पुणे: आज कोविडच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा १८ महिन्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालयात आगमन झाले. जागतिक महामारी असणाऱ्या कोरोनाने कधी नव्हते एवढा काळ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले, परंतु आता पुन्हा नव्या उमेदीने शाळा सुरू होताय तर मग या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी आज विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी-शिक्षकांच्या स्वागताचा अनोखा उपक्रम राबवला.
: नियमांचे पालन करत शाळा सुरु
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करत मास्क सॅनिटायझर व चॉकलेट्सचे वाटप केले तसेच विध्यार्थ्यासह शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस द्वारा शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये खासदार वंदना चव्हाण ऑर्चीड स्कूल बाणेरा, प्रशांत जगताप वानवडी, सुनील टिंगरे गेनबा मोझे स्कूल येरवडा, चेतन तुपे रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, दिपाली धुमाळ दिगंबर वाडी शाळा, अंकुश काकडे शिवाजी मराठा हायस्कूल, काका चव्हाण, संतोष चाकणकर बंडोजी चव्हाण विद्यालय धायरी, अप्पा रेणुसे चिंतामणी विद्यालय, उदय महाले, निलेश निकम मॉर्डन हायस्कूल, श्रीकांत पाटील राजेंद्र प्रसाद विद्यालय बोपोडी, दीपक मानकर प्रतिभा पवार विद्यालय एरंडवणा, दिलीप बराटे मामासाहेब विद्यालय वारजे, अश्विनी कदम,नितिन कदम विद्या विकास शाळा, बाबुराव चांदेरे कै. सोपानराव कटके विद्यालय बाणेर, सदानंद शेट्टी बाबूराव सणस कन्या विद्यालय मंगळवार पेठ, मच्छिंद्र उत्तेकर, सागर काकडे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, दत्तात्रय धनकवडे ज्ञानेश स्कूल, व्यंकटेश स्कूल धनकवडी, विशाल तांबे म न पा शाळा 91G,श्री रविन्द्र माळवदकर,शिवानी माळवदकर धनराज गिरजी शाळा,सायली वांजळे कै. गुलाबराव वांजळे शाळा अहिरे, वैशाली बनकर महात्मा फुले शाळा,रामचंद्र बनकर शाळा हडपसर,दीपक पोकळे, अजिंक्य पायगुडे रेणुका स्वरूप शाळा. तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या भागातील स्थानिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
COMMENTS