पालखी मार्गाच्या पाहणी बाबत राष्ट्रवादी युवक चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
आगामी आषाढी वारी सोहळ्या निमित्त पालखी चे प्रस्थान लवकरच पुण्यात होणार आहे. याच अनुषंगाने वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी व वेळ असता उपाययोजना कराव्यात असे निवेदन राष्ट्रवादी युवक चे कोथरूड चे अध्यक्ष .गिरीश गुरूनानी यांनी आज अतिरिक्त आयुक्त कार्यालयात कुणाल खेमणार साहेब यांच्याकडे दिले.
पालखी मार्गाची पाहणी करून अडथळा आणि धोकादायक वृक्षांची छाटणी, फिरती शौचालये, औषधांची फवारणी, पिण्याचे स्वच्छ पाणी, उघड्या चेंबर्स ना झाकण बसवणे तसेच अग्निशमन वाहने ही पुरवावित अश्या अनेक योजनांबद्दल गुरुनानी यांनी मा. अतिरिक्त आयुक्त यांच्या बरोबर चर्चा केली. अतिरिक्त आयुक्तांनी ही या वेळी सर्व निवेदन लक्षात घेऊन त्यावर नक्कीच उपाय केले जातील असे आश्वासन ही दिले.
कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता त्या वर ही ठोस उपाय व्हायला हवेत असे मत ही आयुक्तां समोर मांडण्यात आले. पालखी सोबत वैद्यकीय पथक व औषध व्यवस्थाही असावी अशी मागणी ही या वेळी करण्यात आली. तसेच वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये अथवा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याच विचारातून आयुक्तांची भेट घेण्यात आल्याचे गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले.
या वेळी राष्ट्रवादी युवकचे मोहित बराटे,केदार कुलकर्णी,ऋषिकेश शिंदे,अजिंक्य साळुंखे,कृष्ण पुजारी आदि कार्यकर्ते उपस्थिती होते.
COMMENTS