Chandrakant Patil appreciated the work of the ruling corporators : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सत्ताधारी नगरसेवकांच्या कामांचे कौतुक

HomeBreaking Newsपुणे

Chandrakant Patil appreciated the work of the ruling corporators : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सत्ताधारी नगरसेवकांच्या कामांचे कौतुक

Ganesh Kumar Mule Mar 12, 2022 9:11 AM

40% Tax Exemption | ४०% करसवलत | राज्य सरकार घालणार लक्ष | मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
Pune Metro Passenger | अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास
Chandrakant patil : BJP : PMC Election 2022 : विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार

 प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सत्ताधारी नगरसेवकांच्या कामांचे कौतुक

: मधुकर बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण संपन्न

पुणे : महानगपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ रस्ते, ड्रेनेज, कचरा यामध्ये अडकून न राहता मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असे प्रकल्प करण्यावर भर दिला. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेला रक्तपेढीचा महत्वकांक्षी प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या कामांचे कौतुक केले.

पुणे महानगपालिकेच्या वतीने मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मध्ये उभारण्यात आलेल्या मधुकर सखाराम बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, नंदिनी मधुकर बिडकर, निलेश आल्हाट, बाळासाहेब पाटोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

पाटील पुढे म्हणाले की, पालिकेकडे स्वतःची अशी रक्तपेढी नव्हती. रक्ताची निर्मिती कृत्रिम पद्धतीने करता येत नाही. त्यामुळे रक्त संकलन आणि रक्तसाठा करण्यासाठी रक्तपेढीची गरज होती. ही बाब लक्षात घेत पालिकेची स्वतःची पहिली रक्तपेढी सुरू होत आहे, याबद्दल बिडकर यांचे विशेष कौतुक केले पाहिजे. पालिकेत नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडताना भाजपच्या नगरसेवकांनी सतत पुणेकरांच्या हिताचे प्रकल्प राबविले आहेत. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, नदी सुधारणा, सांडपाणी प्रकल्प याबरोबरच विविध भागात उड्डाणपूल, अर्बन स्ट्रीट डिझाईनचे रस्ते यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी करोनाच्या काळात पालिकेने आपली आरोग्य व्यवस्था सक्षम केली. पालिकेकडे आज काही हजार ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. पालिका स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करत आहे. यासाठी स्वतःची रक्तपेढी असणे आवश्यक होते. ती जबाबदारी बिडकर यांनी घेतली आणि यशस्वीपणे पूर्ण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बिडकर यांनी ही रक्तपेढी उभारण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. जगात प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते. पालिकेची स्वतःची अशी एकही रक्तपेढी नव्हती. परिणामी रक्ताची गरज भासल्यास प्रत्येकवेळी इतर रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. ही गरज ओळखून गेल्या वर्षीच्या पालिकेच्या अंदाजपत्रकात रक्तपेढीसाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार गेले वर्षभर काम करून पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ‘मधुकर बिडकर रक्तपेढी’ची निर्मिती करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा निश्चितपणे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्याने विशेष आनंद वाटत आहे. शहरातील सर्वात अद्यावत अशी ही रक्तपेढी असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पवार यांनी केले. तर आभार उद्धव मराठे यांनी मानले.

 

कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गणेश बिडकर यांच्या विकास निधीतून अत्याधुनिक लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाच्या सर्व मजल्यांवर नवीन एलईडी लाईट, पंखे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला २५ किलोवॅट विजेची बचत होत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0