Shane Warne : फिरकीचा बादशाह शेन वॉर्न  चे निधन 

HomeBreaking Newsदेश/विदेश

Shane Warne : फिरकीचा बादशाह शेन वॉर्न  चे निधन 

Ganesh Kumar Mule Mar 04, 2022 3:21 PM

Handa Morcha : PMC : माजी जलसंपदा राज्यमंत्री पुणे महापालिकेवर आणणार हंडा मोर्चा 
Anandacha Shidha | Diwali | सिंहगड रोड भागातील एकाही स्वस्त धान्य  दुकानांमध्ये दिवाळी किट उपलब्ध नाही  | धान्य उपलब्ध करून देण्याची महेश पोकळे यांची मागणी 
Prashant Kishor : भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल  : प्रशांत किशोर यांचा मोदींना टोला

फिरकीचा बादशाह शेन वॉर्न  चे निधन

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता.

1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणारा शेन वॉर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. 13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेलेल्या शेन वॉर्ननं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. वनडेच 194 या दिग्गजाच्या खात्यात 293 विकेट्स आहेत. ज्या क्रिकेट संघात जलदगती गोलंदाजांचा भरणा आपण आजही पाहतोय त्यात या फिरकीपटून आपला हातखंडा दाखवून दिला. त्याच्या रुपात क्रिकेट जगताने महान क्रिकेटर गमावला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन त्याला ओव्हरटेक करुनच अव्वलस्थानी पोहचला होता. वॉर्न आपल्या फिरकीसोबतच गरजेच्या वेळी उपयुक्त फलंदाजी करण्यातही माहिर होता. तो असा एकमेव खेळाडू आहे ज्याने शतकाशिवाय कसोटीमध्ये 3000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

2 जानेवारी 1992 मध्ये वॉर्नने भारतीय संघाविरुद्ध सिडनीच्या मैदानातून कसोटीमध्ये पदार्पण केले होते. 2 जानेवारी 2007 मध्ये सिडनीच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 71 धावा खर्च करून 8 विकेट्स ही त्याची कसोटीतील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. कसोटीत 37 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या वार्नने 194 वनडे सामन्यात एकदा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0