श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरासाठी जागा आणि भिडे वाड्यात जागतिक दर्जाची शाळा
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालगतची जागा मंदिराला मिळावी, याबाबत गृहमंत्र्यांनी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. तसेच, भिडे वाड्यात जागतिक दर्जाची आदर्श शाळा सुरू व्हावी आणि या कामाचा शुभारंभ दोन – तीन महिन्यांत व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे केवळ शहराचेच नव्हे, तर जगभरातील भाविकांचे आस्थेचे केंद्र आहे. या मंदिरालगत असलेली राज्याच्या गृह विभागाची जागा मंदिराला मिळावी, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे ट्रस्टी शरदचंद्रजी पवार साहेबांना सातत्याने संपर्क साधत होते. त्याचा मान राखत पवार साहेबांनी शुक्रवारी पुणे भेटीत राज्याचे गृहमंत्री मा. दिलीपजी वळसे – पाटील, पोलिस आयुक्त मा. अमिताभजी गुप्ता, महानगरपालिकेचे आयुक्त मा. विक्रम कुमारजी आणि आम्हा पक्ष कार्यकर्त्यांसह गृह विभागाच्या या जागेला भेट दिली. या बाबत गृहमंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन जागेचा निर्णय घ्यावा, अशा सूचना पवार यांनी या वेळी दिल्या.
तसेच, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याला पवार साहेबांनी भेट दिली. भिडे वाडा येथे जागतिक दर्जाची आदर्श आशा सुरू व्हावी, अशी सूचना महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली. तसेच, या कामाचा शुभारंभ दोन-तीन महिन्यांत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांची उपस्थिती होती.
COMMENTS