Smart Identity Card | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘स्मार्ट ओळखपत्र’ अनिवार्य  | 10 ते 13 लाखाचा होणार खर्च 

HomeBreaking Newsपुणे

Smart Identity Card | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘स्मार्ट ओळखपत्र’ अनिवार्य  | 10 ते 13 लाखाचा होणार खर्च 

Ganesh Kumar Mule Aug 17, 2022 2:10 PM

PMC election 2022 | सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग धायरी-आंबेगाव  | सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त | प्रारूप मतदारयाद्या जाहीर 
Wildlife Week | पृथ्वीवर जगण्याचा अधिकार माणसां एवढाच प्राणीमात्रांनाही | वैभव काकडे
PMC Deep Clean Drive | महापालिकेच्या घनकचरा आणि इतर विभागाच्या माध्यमातून शहरात डिप क्लीन ड्राईव्ह!

महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘स्मार्ट ओळखपत्र’ अनिवार्य

| 10 ते 13 लाखाचा होणार खर्च

पुणे | महापालिकेत “Aadhar Enable Bio-Metric Attendance System” दैनंदिन हजेरी प्रणाली  सुरू करण्यात आली आहे. विद्युत विभागाकडून पुणे महानगरपालिकेच्या विविध ठिकाणी Bio-
Metric Attendance Machine बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी / कर्मचारी यांच्या ओळखपत्रांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी पुणे मनपाच्या विविध कार्यालयांसाठी संबंधी खातेप्रमुख / विभाग प्रमुख यांनी त्यांच्या स्तरावर संकीर्ण मधून नव्याने स्मार्ट ओळखपत्र खरेदी करून देण्यासाठी महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली आहे. हे ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. त्यानुसार महापालिका 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र खरेदी करणार आहे. एका ओळखपत्राची किंमत 136 रुपये आहे. यासाठी 10 ते 13 लाख पर्यंत खर्च येणार आहे. दरम्यान याची आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार हे ओळखपत्र बायोमेट्रिक हजेरी साठी तसेच अंशदायी आरोग्य सहायता योजनेसाठी साठी देखील वापरले जाईल. त्याचप्रमाणे या ओळखपत्राच्या माध्यमातून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सर्व माहिती एकत्रित ठेवली जाईल.  त्यासाठी हे ओळखपत्र खरेदी केले जाणार आहे. पहिल्यांदा हे ओळखपत्र कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी दिले जाईल. त्यांनतर फिल्ड वरील आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याना दिले जाईल.  दरम्यान याबाबत महापालिका आयुक्तांनी एक सर्क्युलर जारी केले आहे.

आयुक्तांचे असे आहेत आदेश

१) पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभाग/कार्यालयामधील अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी संबंधित विभाग प्रमुख / खातेप्रमुख यांनी त्यांचे स्तरावर संकीर्ण मधून मे. ICARDWALA.COM या एजन्सी कडून र.रु. ११५ + GST१८%= १३६.००/- या दराने 4K स्मार्ट ओळखपत्र, लेस व कार्ड होल्डरची खरेदी तात्काळ करावी. या बाबत विद्युत विभागाशी संपर्क साधावा.
२) स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध होई पर्यंत पुणे महानगरपालिकेकडील प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या आधारकार्ड नंबर मधील शेवटचे आठ अंक Bio-Metric Attendance Machine मध्ये टाकून थम्ब इम्प्रेशन करून आपली दैनंदिन हजेरी कार्यालय / विभागामध्ये येताना व जाताना नोंदविणे बंधनकारक आहे.
३) सदर “Aadhar Enable Bio-Metric Attendance System” दैनंदिन हजेरी प्रणाली पुणे महानगरपालिकेमधिल सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन पत्रकास जोडण्याची पूर्व तयारी बाबतची कार्यवाही उप आयुक्त, माहिती व तंत्रज्ञान विभाग व ई-प्रशासक, माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी
मुख्य अभियंता (विद्युत) व सह आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याशी समन्वय साधून करावयाची आहे.
४) “Aadhar Enable Bio-Metric Attendance System” दैनंदिन हजेरी प्रणाली बाबत, Bio-Metric Attendance Machine व स्मार्ट ओळखपत्र बाबत काही तक्रारी असल्यास श्री. श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता (विद्युत) यांचेशी संबंधित विभागप्रमुख / खातेप्रमुख यांनी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावयाची आहे.