Skating National Championship | स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिपच्या अंडर सेवनमधील निवडीबद्दल पर्णिका इंदापुरेचा विजयराज पतसंस्थेतर्फे सत्कार
Vijayraj Patsanstha – (The Karbhari News Service) – स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिपच्या अंडर सेवनमध्ये निवड झाल्याबद्दल पर्णिका रोहित इंदापुरे हिचा पिंपळे गुरवमधील विजयराज पतसंस्थेने सत्कार करीत सामाजिक बांधिलकीचा वसा जपला आहे. (Pimpari News)
विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कुरुलकर यांनी सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, मिठाई व मदत म्हणून धनादेश स्वरूपात रक्कम देऊन पर्णिकाचा सत्कार करीत तिला अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण श्रीपती पवार, खजिनदार सखाराम वालकोळी, व्यवस्थापक युवराज नलावडे, सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक, पर्णिकाचे वडील रोहित इंदापुरे, मोठी बहिण समिक्षा इंदापुरे, विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सूर्यकांत कुरुलकर म्हणाले, की मोबाईलच्या युगामध्ये खेळाला प्राधान्य देत मेहनत व जिद्दीच्या जोरावर पर्णिकाने हे घवघवीत यश संपादन केले आहे. मुलींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तिला संस्थेच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली.
आजापर्यंत विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सामाजिक सामाजिक दृष्टीने अनेक कामे केली आहे. अतिवृष्टीमुळे माळीन (ता. आंबेगाव)मध्ये भूस्खलनामधील आपत्तीग्रस्ताना आर्थिक मदत करण्यात आली. ममता अंध व अपंग अनाथ कल्याण केंद्र पिंपळे गुरव येथील मुलांसाठी वेळोवेळी अन्नधान्य व फळ वाटप करण्यात येत आहे. देशाच्या सेवेत असताना पुलवामा येथील शहीद जवानाच्या कुटुंबास त्यांच्या मूळ गावामध्ये खानदेश जळगाव येथे आर्थिक मदत करण्यात आली. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदत निधी देण्यात आला. कोविड 19 च्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी देण्यात आला. निगडी प्राधिकरण येथील दिव्यांग प्राधिक प्रतिष्ठानच्या सामाजिक विवाह सोहळ्यास आर्थिक मदत करण्यात आली. मन:शक्ती केंद्र लोणावळा येथे आर्थिक मदत करण्यात आली. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी भूस्खलन दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच शिक्षण घेत घेत कराटे, स्केटिंग सारख्या खेळांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरव करून मदत निधी देण्यात आला.
COMMENTS