पालिकेने केला नाही म्हणून सुस मधील नागरिकांनी रस्ता बनविण्याकरिता घेतला पुढाकार
वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पत्र व्यवहार करून देखील महादेव नगर सुस येथील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या प्रश्नाचे उत्तर महानगरपालिकेला विचारले असता पालिकेकडून निधी नसल्याचे वेळोवेळी सांगण्यात आले म्हणून स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोडचे काम आपल्या हाती घेतले आहे. सर्व स्थानिक नागरिकांनी आपल्या स्वखर्चातून रोड वरती मुरूम टाकून रोड तात्पुरत्या स्वरूपाचा चालू करण्यात आला आहे. तरीदेखील पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर या रोडचा प्रश्न मार्गी लावावा अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रयत विद्यार्थी परिषदेचे खजिनदार ऋषिकेश कानवटे, अशोक लिपणे, बबन गडसिंग, मल्लिनाथ बिराजदार, हनुमंता पुजारी, भगवान आंबुरे, हरी पवार, अमोल चव्हाण, धोंडीराम रेंगे, प्रमोद चांदरे, सुनील चांदरे, सचिन कामटकर, अनिल अंभोरे, प्रकाश सामाले, केशव पवार, पिराजी कानवटे, माणिक अंभोरे या सर्वांच्या पुढाकारामुळे रोडची अवस्था येण्या जाण्या योग्य झाली आहे. तरी महानगरपालिके प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे. अशी मागणी ऋषिकेश पिराजी कानवटे खजिनदार, रयत विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.