श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंकेची निवडणूक बिनविरोध
पुणे येथील ” श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंकेची सन २०२३ ते २०२८ या कालावधीची निवडणूक बिनविरोध पार पाडली असून बॅंकेच्या अध्यक्षपदी ऍड अभय भाकचंद छाजेड तर उपाध्यक्षपदी अशोकराव झुनबरलाल नहार यांची एकमताने निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ.स्नेहा जोशी यांनी कामकाज पाहिले.पुणे शहरातील महत्वाच्या चार शाखा पूर्णपणे संगणकीकृत कार्यरत असून.श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंक नाविन्याचा व नविन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करून व्यवसायवाढ करत आहे.
सन २०२३— २०२८ या कालावधीसाठी पुढील संचालकांची निवड बिनविरोध झाली. नवनियुक्त संचालक —— ऍड .अभय भाकचंद छाजेड, .सुरेश मारुती कोते, विजयकुमार मर्लेचा, संजय रमेशलाल गुगळे, मोरेश्वर देशपांडे, विरेंद्र किराड, अशोक नहार , अमरजितसिंग मक्कड , बाबूराव गायकवाड, अविनाश गुलाबचंद कोठारी , प्रिया महिंद्रे , भावना केदारी , नारायण गोंजारी , विलास पगारीया, नितीन शहा , हिंमत संचेती, संजय लोढा असून वरील कार्यक्रमास सर्वजण उपस्थित होते