Industrial water usage | औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या  | जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेचे ‘चॅलेंज’ 

HomeBreaking Newsपुणे

Industrial water usage | औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या  | जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेचे ‘चॅलेंज’ 

Ganesh Kumar Mule Dec 29, 2022 2:14 PM

Irrigation Dept Vs PMC | वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद
Domestic Water Use | पाणी कोटा १६.५२ TMC करण्याची महापालिकेची पाटबंधारे कडे मागणी
PMC Water Budget | महापालिकेकडून 20.90 टीएमसी पाणी देण्याची मागणी ; पण पाटबंधारेने मात्र फक्त 12.82 TMC पाणी कोटा केला मंजूर

Industrial water usage | औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या  | जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेचे ‘चॅलेंज’ 

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune)  पुणे मनपा क्षेत्रामध्ये येत असलेल्या विविध घरे, सदनिका, कार्यालये,शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था व अन्य संस्थांना घरगुती वापरासाठी (Domestic Use) म्हणजेचपिण्यासाठी, घरगुती कपडे, भांडी व अन्य स्वच्छता विषयक कामांसाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. पुणे मनपामार्फत कुठल्याही औद्योगिक अथवा व्यापारी वापरासाठी (Industrial use) पाणी पुरविण्यात येत नाही. असा दावा पुणे महापालिकेने केला आहे. औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या, असे आव्हान महापालिकेने जलसंपदा विभागाला (water resources dept) केले आहे. तसेच औद्योगिक पाणी वापरापोटी बिलाची रक्कम आकारण्यात न येता केवळ घरगुती (Domestic) पाणी वापरासाठीचे बिल आकारण्यात यावे. असे देखील महापालिकेने जलसंपदा विभागाला म्हटले आहे.

पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाला हे आव्हान दिले आहे. यामुळे महापालिकेचे पैसे वाचणार आहेत. महापालिकेने याबाबत जलसंपदा विभागाला पत्र लिहिले आहे. त्यानुसार  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९६ मुद्दा क्र. २ अन्वये धंदयाच्या किंवा विक्रीच्या प्रयोजनासाठी शहरातील कोणत्याही रहिवाश्यास पुणे मनपामार्फत पाणी पुरविता येत नाही. पुणे पाटबंधारे मंडळ मार्फत प्राप्त झालेल्या सन २०१२ ते आजतागायत पर्यंतच्या सर्व पाणी देयकांमध्ये औद्योगिक पाणी वापराकरिता पुणे मनपास बिल आकारणी करण्यात आलेली आहे. मात्र पुणे मनपामार्फत औद्योगिक वापराकरिता पाणी पुरविण्यात येतच नसल्याने औद्योगिक पाणी वापरापोटी आकारलेले बिल चुकीचे ठरते.  पुणे मनपामार्फत औद्योगिक संस्थांना केवळ पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी (Domestic Use) पाणी पुरविले जाते. त्यामुळे सदर पाणी वापरास औद्योगिक पाणी वापर संबोधणे चुकीचे आहे. (pune municipal corporation)
महापालिकेने पुढे म्हटले आहे तरी, पुणे महानगरपालिका बिगर सिंचन पाणी वापराच्या सन २०१२ ते आजतागायत पर्यंतच्या पाणी देयकांमधील औद्योगिक पाणी वापरापोटी आकारलेले पाणी दर ऐवजी घरगुती पाणी वापराचे दर आकारून फरकाची रक्कम पुणे मनपास परत करण्यात यावी व भविष्यात देण्यात येणाऱ्या पाणी देयकांमध्ये औद्योगिक पाणी वापरापोटी रक्कम आकारण्यात न येता केवळ घरगुती (Domestic) पाणी वापरासाठीचे बिल आकारण्यात यावे. यावर आता पाटबंधारे विभागाची भूमिका काय असेल. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
| पाटबंधारे आणि महापालिकेची पाहणी 
 पाण्याच्या वाढीव बिलावरून पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागात जुंपली आहे. जलसंपदा विभाग वाढीव बिले देते, अशी महापालिकेने भूमिका घेतली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर देखील याबाबत चर्चा झाली आहे. त्यावेळी दोघे मिळून याबाबत चर्चा करा. असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यावरून दोन्ही विभागामध्ये चर्चा सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून दोन्ही विभागानी आज एकत्र पाहणी करत बिलाबाबत चर्चा केली.