Shivgarjana Mahanatya | येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य | 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन

Homeपुणेsocial

Shivgarjana Mahanatya | येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य | 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन

गणेश मुळे Feb 23, 2024 2:28 PM

Shivneri | किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन | राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा | अरविंद शिंदे
Shivrajyabhishek Din  | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यात फडकवला तिरंगा ध्वज

Shivgarjana Mahanatya | येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य | 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन

|छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार

Shivgarjana Mahanatya | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त येरवडा येथे आज शनिवारपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘शिवगर्जना’ या आशिया खंडातील भव्य-दिव्य महानाट्य साकारले जाणार आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी ही माहिती दिली.

येरवडा जेल रोड येथील के.के. भवन समोरील मैदानावर दि. 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत साय. साडेसहा ते रात्री साडेनऊ यावेळेत हे महानाट्य होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी मी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार वडगाव शेरी मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे. हे महानाटय विनामुल्य असून शिवप्रेमींनी या महानाट्याला उपस्थित रहावे.

शिवगर्जना महानाट्याचे वैशिष्टे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपुर्ण जीवपट उलगडणारे हे जिवंत महानाट्य आहे. त्यामध्ये 300 कलाकारांचा भव्य संच असणार असून फिरता 65 फुटी रंगमंचावर हे नाटय सादर होणार आहे. त्यात हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्षात वापर होणार असून चित्तथरारक लढाया, रोमांचकारी प्रसंगातून धगधगत्याची इतिहासाची आठवण करून दिली जाणार आहे. याशिवाय नेत्रदिपक अतिशबाजी पाहता येणार आहे.
———————
महानाट्यात साकारणार हे प्रसंग

– शिवजन्म
– युध्द कला व राज्य कारभाराचे प्रशिक्षण
– स्वराज्याची शपथ, अफजलखान वध
– पन्हाळगढ वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा
– शाहिस्तेखानाची फजिती
– सुरत लुट व कोकण मोहिम
– पुरंदरचा वेढा व मुरारबाजीचे शौर्य
– आग्रा भेट व तानाजी मालुसरे बलिदान
– छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा