Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक बाबत १५ दिवसात निर्णय घ्या| अन्यथा मुख्यमंत्र्यांना अडवू
| माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा
| काँग्रेसचे जोरदार आंदोलन
Shivajinagar ST Stand |पुणे : प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक (Shivajinagar ST Stand) पूर्ववत सुरू होण्यासाठी निर्णय घेतले जावेत. अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू, असा इशारा माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी दिला आहे. (Pune Congress Agitation)
शिवाजीनगर बसस्थानक लवकरात लवकर पूर्ववत सुरू व्हावे या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर आज (गुरुवारी) आंदोलन करण्यात आले. आमचे छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानक परत द्या, पुणेकरांचा अंत पाहू नका, शासनाच्या बेपर्वाईमुळे पैसे आणि वेळ का वाया घालवायचा? असे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. एसटीचे विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात आले. पुणे- मुंबई महामार्गालगत स्थलांतर झाल्याने वर्दळीच्या रस्त्यावर एसटी वाहनुकीची भर पडली. स्थलांतर तात्पुराने असल्याने वाहतुकीची गैरसोय सहन केली. महामेट्रोचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले, अद्याप शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत सुरू झाले नाही. महामेट्रो आणि एसटी खात्यात समन्वय नाही. शिवाजीनगर एसटी स्थानकाचा आराखडा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते असल्याने त्यांच्याकडे सादर झाला. पण अद्याप निर्णय नाही. येत्या १५ दिवसात निर्णय होऊन एसटी स्थानक काम मूळ जागी सुरू व्हावे, असे निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनात मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, संजय बालगुडे, चंद्रशेखर कपोते, नुरुद्दीन सोमजी, नरेंद्र व्यवहारे, प्रवीण करपे, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, शाबीर खान, भरत सुराणा, चेतन अग्रवाल, नितीन जैन, सुरेश कांबळे, अयुब पठाण, शंकर थोरवे, अविनाश अडसूळ, उमेश काची, स्वाती शिंदे, ॲड.रोहिणी शिंदे, अनिता माखवणा, अंजली सोलापुरे, मोना रायकर, मोहिनी मल्लव, संगीता थोरात, प्रशांत मिटपल्ली, अस्पाक शेख, विजय वारभुवन, डॉ अनुपकुमार बेघी, हेमराज साळुंखे, महेन्द्र चव्हाण, शकील ताजमत, दिलीप थोरात, लहू जावळेकर, नंदू बनसोडे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.