Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्टँड दिरंगाईबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी माफी मागावी – दत्ता बहिरट
Datta Bahirat Vs MLA Siddharth Shirole – (The Karbhari News Service) – शिवाजीनगर एसटी स्टँड (Shivajinagar ST Stand) पूर्वीच्याच जागी सुरू होण्यासाठी महामेट्रो (Mahametro) व एसटी महामंडळ (MSRTC) यांच्यात लवकरच करार होणार असून, काम सुरू होईल, असे शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी दिलेली माहिती म्हणजे दिरंगाई आणि स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न असून, या प्रदीर्घ दिरंगाईबद्दल व त्यामुळे पुणेकरांना झालेल्या त्रासाबद्दल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणेकरांची माफी मागावी, असे काँग्रेस नेते दत्ता बहिरट (Datta Bahirat Pune Congress) यांनी टीका करतांना म्हंटले. (Pune News)
शिवाजीनगर एसटी स्टँड पूर्वीच्याच जागी सुरू होण्यासाठी काँग्रेस पक्षाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एसटी विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यामुळे मूळ जागी एसटी स्टँडची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, असे सांगून दत्ता बहिरट म्हणाले की, मात्र या निर्णयास एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी शिवाजीनगर एसटी स्टँडच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झाले नाही. आता ते काम सुरू होणार, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे सांगतात. मात्र गेले सुमारे सव्वा वर्ष हे काम सुरू का नाही झाले? आणि तेव्हादेखील स्वतः आमदार असूनही या कामाकडे त्यांनी का लक्ष दिले नाही? असा सवाल दत्ता बहिरट यांनी विचारला.
दत्ता बहिरट म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी शिवाजीनगर भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यामुळे शिवाजीनगर एसटी स्टँड वाकडेवाडी येथे तात्पुरता हलविण्यात आला. यामुळे झालेली गैरसोयदेखील पुणेकरांनी मान्य केली. मात्र या कामात मोठी दिरंगाईही झाली. भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हेच गेली पाच वर्षे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार असूनही त्यांनी या दिरंगाईकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवाजीनगर एसटी स्टँड पुनर्बांधणीचे काम लवकरच सुरू होईल, असे मोघमपणे सांगत त्यांनी पुणेकरांची दिशाभूल केली. त्यामुळेच त्यांची निष्क्रियता व पुणेकरांना झालेल्या मनस्तापाबद्दल त्यांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी दत्ता बहिरट यांनी केली.
COMMENTS