कसलाही संबंध नसताना शरद पवार पुणे मेट्रोने फिरून आले
: पवारांच्या प्रतिक्रियेवर भाजपची तिखट प्रतिक्रिया
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात येणार असून ते पुणे दौरा करणार आहे. पुण्यातील बहुप्रतिक्षित मेट्रोचा प्रारंभ मोदी करणार आहेत. मात्र मोदींच्या येण्याआधीच महाराष्ट्राचं राजकारण तापल्याच दिसून येत आहे. मोदींच्या दौऱ्याच्या एकदिवस आधी शरद पवारांनी मेट्रोच्या कामाबाबत विधान केलं होतं. त्याला भाजपने चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपचे मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवून आणण्यासाठी प्रयत्न करतातय. सरकारमधील चार मंत्री युक्रेनमधील विद्यार्थ्यांना सोडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज सहा विमानांनी विद्यार्थी आलेत. मात्र केंद्र सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नाही, असं दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पवार करत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी यांनी केली.
महाजन पुढं म्हणाले की, विकासकामं पूर्णत्वाकडे जात आहेत. काही कामं पूर्ण झाली. मात्र काही दिवसांपूर्वी शरद पवार कारण नसताना मेट्रोमध्ये फिरून आले. आपण किती चांगलं काम करतो हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र मेट्रोचा आणि पवारांचा काडीचा तरी संबंध आहे का, असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला.
दरम्यान शरद पवार राजकीय आरोप करतात. मात्र मोदी येणार असल्याने पुणे भाजपमय, मोदीमय झालंय. त्याचं पवारांना वाईट वाटत आहे. त्यामुळे ते वाटेल ते आरोप करतायत असंही महाजन यांनी म्हटलं.
शरद पवार म्हणाले होते की,’रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. ‘आज ही हजारो मुलं अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत.
COMMENTS