Mula-Mutha River Improvement : Sharad Pawar : मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेत शरद पवारांनी घातले लक्ष 

HomeपुणेBreaking News

Mula-Mutha River Improvement : Sharad Pawar : मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेत शरद पवारांनी घातले लक्ष 

Ganesh Kumar Mule Mar 12, 2022 1:21 PM

River Improvement : नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 
River Improvement : नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 
Sanvad yatra by NCP : महाविकास आघाडीचे सर्व निर्णय शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवा 

मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेत शरद पवारांनी घातले लक्ष

: मुळा मुठा नदी प्रकल्पाच्या कामाबाबत शंका निरसनासाठी समिती गठीत

मुंबई- पुणे येथील मुळा मुठा नदीची स्वच्छता आणि संवर्धन होण्यासाठी शासन उपाययोजना करीत आहे. या प्रकल्पाबाबत शंकांचे निरसन व्हावे आणि अडचणींवर मात करून स्वच्छ, सुरक्षित नदी परिसरासाठी काम सुरू व्हावे यासाठी आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुणे येथील प्रस्तावित रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटबाबत आज खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

पुण्यातील मुळा मुठा नदी प्रकल्पाच्या कामाबाबत काही पर्यावरणवादी, तज्ज्ञ तसेच स्थानिक सामाजिक संस्थांनी प्रश्न उपस्थित केले असले तरी मुळा मुठा नदीची स्वच्छता आणि संवर्धन व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास करून शंका निरसन करण्यासाठी पर्यावरण विभाग, नगरविकास विभाग आणि जलसंपदा विभागातील तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक लवकरच पुणे येथे होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी व नदी हे सर्वसामान्य पुणेकरांचा हक्क अबाधित राहण्यासाठी योग्य कार्यवाही होण्यासाठी तज्ञ समिती कामकाज करेल, असे सांगितले.