Sharad Joshi Vicharmanch Shetkari Sanghatna | यापुढे शेतकऱ्याची बाजार समितीत लूट होणार नाही | विठ्ठल पवार राजे 

HomeBreaking Newsपुणे

Sharad Joshi Vicharmanch Shetkari Sanghatna | यापुढे शेतकऱ्याची बाजार समितीत लूट होणार नाही | विठ्ठल पवार राजे 

कारभारी वृत्तसेवा Oct 27, 2023 3:39 PM

APMC | Rankings | राज्यातील बाजार समित्यांचे रँकिंग होणार जाहीर
APMC | कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
Pune Congress Agitation | APMC | पुणे काँग्रेस चे बाजार समितीच्या विरोधात आंदोलन

Sharad Joshi Vicharmanch Shetkari Sanghatna | यापुढे शेतकऱ्याची बाजार समितीत लूट होणार नाही | विठ्ठल पवार राजे

| पिकेल तिथे विकेल या शेतकरी संघटनेच्या मागणीवर राज्य अन्न आयोगाचा शिक्का मोर्तब

 

Sharad Joshi Vicharmanch Shetkari Sanghatna | केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतमालाला (Farmers Produce) रास्त आणि  हमीभाव हा शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही. सातत्याने शेतकऱ्यांचा शेतमाल हा तोट्याने खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येत (Farmer Suicide) वाढ झालेली आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान (Farmer Economic Lifestyle) हे खालवले असल्याचा गंभीर आरोप करत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने केला आहे. तसेच याबाबत महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाकडे अन्नसुरक्षा कायद्याच्या कलम 16 (6) (ग) अन्वये दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचा (Maharashtra State Food Commission) मोठा निर्णय आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची बाजार समितीत (Market Committee) लुट होणार नाही. अशी माहिती याचिकाकर्ते विठ्ठल पवार राजे (Vitthal Pawar Raje) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पवार राजे यांनी सांगितले कि, महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय पोषण आहार व सरकारी इतर विभागाला लागणारे अन्नधान्य थेट शेतकरी किंवा फार्मर प्रोडूसर कंपनीकडूनच खरेदी करावे, असा स्पष्ट आदेश शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी उच्च न्यायालयाचे वकील विधीन्य अजय गजानन तल्हार व शिल्पाताई गजानन तल्हार या वकील बंधूंचे मार्फत दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाने दिनांक 17आक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण व राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना किमान 120 दिवसाचा रोजगार मनरेगाच्या माध्यमातून मिळण्यास मार्ग मोकळा झाल्यामुळे शेतकऱ्यांना किमान प्रतिव्यक्ती 120 दिवस मनरेगाच्या माध्यमातून शेती करताना शेती कष्टाचा रोजगार मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होऊन महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावून त्यांना सुखाने आणि सन्मान मिळवून देण्यामध्ये या निर्णयाचा उपयोग होऊ शकतो म्हणून हा ऐतिहासिक निर्णय संघटनेने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या चरणी समर्पित केला आहे. आत्महत्या करणे हा पर्याय नसून यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. याची दक्षता संघटनेने तर घेतलेली आहे. परंतु ती राज्य सरकारच्या सर्व शेतीशी निगडित घटकांनी घ्यावी आणि राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाचे राज्य सरकारने तत्काळ शासन निर्णय आदेश काढून कायदेशीर अंमलबजावणी करावी. अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष तथा याचिका कर्ते विठ्ठल पवार राजे यांनी आज साखर संकुल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी त्यांनी राज्य आयोगाचे देखील आभार मानले त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित सर्व मंत्रालयाने राज्य अन्न आयोगाच्या आदेशाचे पालन करण्याचा साठी शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील याचिका कर्ते तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी यावेळी केली. त्यावेळी संघटनेचे कार्यकारणी समितीचे प्रदेशाध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील, अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, कामगार आघाडीचे अध्यक्ष हिरामण बांदल, नगर नाशिक विभाग कांदा उत्पादक व सहकार आघाडीचे अध्यक्ष जगन्नाथ कोरडे पाटील, दिलीप वर्पे पाटील, राजगुरू नगर तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील लोखंडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल शेतकरी, दिपक फाळके, संदीप गवारे, दादापाटील नाबदे, दिलीप पोटे, आरिफ शेख, दौलतराव गणंगे, जेष्ठ शेतकरी नेते कार्याध्यक्ष नगर जिल्हा अशोकराव यळव़डेनाना, शिरूर तालुका अध्यक्ष यशवंत बांगर, सातारा जिल्हा अध्यक्ष अमोल पिसाळ, आदि पदाधिकारी उपस्थित होते.