लूट करणाऱ्या भाजपाला खड्यासारखे बाजूला करा
: शरद पवार यांचे आवाहन
पुणे : केंद्राकडून (central government) कारखानदारी वाढविण्याचे धोरण दिसत नाही. कामगारांचे अधिकार संपवण्याची नवी निती येत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढताहेत, महागाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखानदारी अडचणीत सापडली आहे. शेतकरी, कामगारविरोधी धोरण आखणाऱ्या केंद्रातील भाजप (bjp) सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपरुपी संकटातून मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. लुट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
रहाटणीत मेळाव्याचे आयोजन
हाटणी काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्याची आणि येथे येण्याची काही कारण होती. मी लोकांची सुख दु:ख समजून घेण्यासाठी आणि त्यांवर उपाय काढण्यासाठी आलो आहे. देशातील नागरिकांवर विविध संकटे आली आहे. गॅस, पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण आहे. केंद्राचे सरकार हे महागाईचे सरकार आहे. कामगारहितविरोधी सरकार आहे. बेरोजगारी वाढत असून कामगारांना नोकरीची शाश्वती राहिली नाही. जीएसटीचे ३० हजार कोटी केंदा्रकडे पडून आहेत. राज्य सरकारला कोणतीही मदत करण्याची भूमिका दिसत नाही. राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. ’’
”शहराची लूट करत आत्ता सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून ते काहीही गोष्टी करू शकतील. मात्र, हे फार काळ चालणार नाही. ते न चालण्याची परिस्थिती जनमाणसात निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सत्तेचा दुरुपयोग कसा होतोय हे घराघरात सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यकत्र्यांनी जागृत व्हायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.”
भ्रष्टाचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा
अमोल कोल्हे म्हणाले, ”देशातील परिस्थिती पहिली, तर शेतकरी, कामगार वर्गांचा आवाज दडपला जात आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपने भ्रष्टाचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा, आम्ही पुन्हा शहरात येणार नाही. शहराचे दोन हिस्से कोणी केले. नक्की मक्तेदारी कुणाची आहे. २०१७ च्या महापालिका निवडणूकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पडला होता. ती गाजराची शेती होती, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.’’
दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘मोदींनी भ्रष्टाचार मुक्त, महागाई मुक्त स्वप्नांना दाखवलं होते, आता देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. कोरोनाच्या संकटात, वादळात केंद्राने मदतीचा हात आखडता घेतला. या शहरातील अनेकांना मंत्री, महापौर केले, संधी दिली तरीही गेल्या वेळी महापालिका का हातातून गेली. याचे आत्मपरीक्षण करायला हवं.’’
COMMENTS