सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह २०२२
| ‘एक पाऊल विश्वासाचे ‘ उपक्रमाने २ डिसेंबर २०२२ रोजी प्रारंभ
|भारत जोडो यात्रा प्रदर्शन, सोनिया शक्ती शिष्यवृत्ती प्रारंभ, महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर आदी विविध कार्यक्रम.
पुणे : कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, सोनियाजी गांधी (Soniya Gandhi, Congress Leader) यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. एक पाऊल विश्वासाचे या उपक्रमाने सप्ताहाचे उदघाटन माजी मंत्री मा. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता एस.एम. जोशी सभागृह येथे होणार आहे. याप्रसंगी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार संग्रामदादा थोपटे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिली.
सोनियाजी गांधी यांनी २००४ साली पंतप्रधानपदाचा (Prime Minister) त्याग केला. तेव्हापासून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००४ सालापासून सलग हा सप्ताह साजरा केला जात असून यंदा १८वे वर्ष आहे. या सप्ताहात दि. २ ते ९ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होतील. महाराष्ट्रातील दिग्गज नेतेही मार्गदर्शन करणार आहेत.
भारत जोडो यात्रा प्रदर्शन
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) चालू असून जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यानच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन दि. ७ ते ९ डिसेंबर रोजी भरविण्यात येणार आहे.
महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर
पत्रकारितेच्या व्यस्त जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे बऱ्याच महिला पत्रकारांना (Woman Journalist) जमत नाही. हे लक्षात घेऊन पूना हॉस्पिटल येथे दि. ७ ते ९ डिसेंबर मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.
सोनिया शक्ती शिष्यवृत्ती योजना
सोनियाजी गांधी यांचा ७६ वा वाढदिवस आहे. यानिमित्त महाविद्यालयीन ७६ विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
माजी मुख्य मंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांचे दि. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी ‘ राज्यघटनेचे संरक्षण आवश्यक विषयावर व्याख्यान.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संस्थांमध्ये विविध कार्यक्रम.
एडस नियंत्रण जनजागृतीसाठी (AIDs control) देवदासींच्या उपस्थितीत सामुदायिक शपथ आणि चित्र प्रदर्शन. बुधवार पेठेतील गुजराती शाळेत दि. ७ रोजी कार्यक्रम होईल.
गाथा रयतेच्या राजाची, हा शाहिरी पोवाड्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम. दोन तासांचा हा कार्यक्रम शहरात विविध भागात सादर केला जाईल.
सफाई कर्मचाऱ्यांना मोफत साडी वाटप.
तृतीय पंथीयांशी संवाद आणि सन्मान.
सुकन्या समृध्दी योजना कार्ड वाटप.
महाआरोग्य तपासणी शिबीर
स्त्री पुरुष समानता विषयावर चर्चा.
आईला सुटी हा गृहिणींसाठी अभिनव उपक्रम.
बॉक्सिंग स्पर्धा.
महिलांसाठी रोजगार मेळावा.