आरोग्य खात्यात काम करणाऱ्या इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवा
: नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची महापालिका आयुक्तांना मागणी
पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून महापालिका आरोग्य खात्यात काम करण्यासाठी इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. आता कोरोनाची लाट संपत आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवा. अशी मागणी नगरसेवक आणि माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
: आयुक्तांना दिले पत्र
डॉ धेंडे यांच्या पत्रानुसार सन २०१९ पासुन पुणे शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण व पहिली लाट सुरु झाली. त्यावेळेस आरोग्य खात्याचे कर्मचारी कमी असल्या कारणाने इतर खात्यामधील कर्मचारी व अधिकारी यांना आरोग्य खात्याकडे हजर करुन घेतलेले आहे. आता सन २०२२ चालु आहे. गेल्या २ वर्षामध्ये कोरोनाच्या तीन लाटांचा प्रादुर्भाव होऊन गेलेला आहे. इतकेच नव्हे तर पुणे शहरामध्ये जवळजवळ ९०% लसीकरण नागरिकांचे झालेले आहे. तिसरी लाट देखिल आता संपत चालेली आहे. पुणे महानगरपालिका मध्ये अटलबिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय चालू होण्याकरिता आपण अनेक डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची देखिल भरती केलेली आहे. हे डॉक्टर वैद्यकिय महाविद्यालयाला प्रशासकिय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत ते नुसतेच बसून पगार घेत आहेत. माझी आपणास विनंती आहे. या डॉक्टरांना पुणे महानगरपालिकाच्या आरोग्य खात्याच्या सेवेमध्ये कार्यरत करावे. तसेच जे कर्मचारी आरोग्य खाते सोडुन इतर खात्यामध्ये काम करित आहेत; त्यांना त्यांच्या मुळ खात्यामध्ये काम करता येईल असे आदेश आपण तत्परतेने दयावे. असे डॉ धेंडे यांनी पत्रात म्हटले आहे.
COMMENTS