पुण्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून सुरु होणार
: महापालिका आयुक्तांचे आदेश जारी
पुणे : ओमायक्रोन विषाणूची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरात तर लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला होता. पुणे शहरात सध्यस्थितीत ओमायक्रोनचा एकच सक्रिय रुग्ण आहे. तसेच परदेशावरून येणाऱ्या प्रवाशांवर पुणे महापालिका लक्ष ठेऊन आहे. त्याच अनुषंगाने शहरातील शाळा १६ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
राज्य सरकारने एक डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ओमायक्रॉन विषाणूमुळे सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण शिक्षण विभाग आणि राजेश टोपे यांनी शाळा सुरु होण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर अनेक जिल्ह्यात शाळा सुरु करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली होती. मात्र मुंबई महापलिककेने या विषाणूचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरु होणार नसल्याचे जाहीर केले होते. तर पुणे महापालिकेने १५ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले होते. त्याच अनुषंगाने शहरातील शाळा १६ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त अशा आम्ही सर्वांनी चर्चा करून शाळा सुरु करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. सर्व नियम पाळून या शाळा गुरुवार पासून सुरु होतील.
COMMENTS