Sasoon Hospital Pune | ससून रुग्णालयात कैद्यांवर उपचार करा; पाहुणचार नको | शिवसेना शहर प्रमुखांची ससूनच्या डीन कडे कारवाईची मागणी

HomeBreaking Newsपुणे

Sasoon Hospital Pune | ससून रुग्णालयात कैद्यांवर उपचार करा; पाहुणचार नको | शिवसेना शहर प्रमुखांची ससूनच्या डीन कडे कारवाईची मागणी

Ganesh Kumar Mule Oct 06, 2023 6:22 AM

Pune News | Team CM च्या सदस्यांनी वाचवले सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे प्राण! 
PMPML Employees Agitation | पी. एम. पी. एम. एल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे पहाटे 3 वाजेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु | आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
State Level Sena Kesari Wrestling Pune | पुण्यात रंगणार राज्यस्तरीय सेना केसरी कुस्त्यांचा फड : 5 लाखांपर्यंतची बक्षिसे!

Sasoon Hospital Pune | ससून रुग्णालयात कैद्यांवर उपचार करा; पाहुणचार नको | शिवसेना शहर प्रमुखांची ससूनच्या डीन कडे कारवाईची मागणी

Sasoon Hospital Pune | ससून सर्वोपचार रुग्णालयात (Pune Sasoon Hospital) उपचार करण्यासाठी येत असलेल्या कैद्यांचा उपचार सोडून पाहुणचार होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. रुग्णालयात उपचार घेत  असलेला कैदी परवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला आहे. त्यामुळे यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी ससूनच्या डीन (Sasoon Dean) कडे केली आहे.
 भानगिरे यांनी दिलेल्या पत्रानुसार अमली पदार्थाच्या तस्करीतील प्रमुख सूत्रधार असलेला ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला. तसेच या रुग्णालयात कैद्यांना मिळत असलेल्या विशेष उपचारांची माहिती ही उघड झाली आहे. ससून रुग्णालयात दाखल होणाऱ्या कायद्यांची शहानिशा करून रुग्णालयातील दाखल होणाऱ्या कैदयांच्या आरोग्याची माहिती ही संबंधित डॉक्टरांकडून त्यांच्यावर कोणते उपचार करण्यात येतात. त्याबाबतच्या त्यांच्या कोणत्या तपासण्या होतात. तसेच प्रलंबित असलेल्या तपासण्यांना अतिशय गांभीर्याने घेऊन कोणत्याही कैद्यावर अत्यावश्यक उपचार सोडून प्राथमिक उपचारासाठी भरती करू नये, तसेच वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली सरकारी रुग्णालयातून अमली पदार्थाचे रॅकेट चालवण्यात येत असल्याच्या बातम्या या अतिशय वेदनादायी आहेत. आपण अधिष्ठाता या नात्याने या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून यापुढे रुग्णालयात दाखल होणाऱ्या कैद्यांवर अतिशय पारदर्शकपणे उपचार होतील यासंबंधीची दक्षता घ्यावी. तसेच अशा पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर कार्यवाही करण्यात यावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे. (Pune Shivsena)
——