Sajag Nagrik Manch pune | दीपक बच्चेपाटील यांना यंदाचा सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार घोषित

HomeपुणेBreaking News

Sajag Nagrik Manch pune | दीपक बच्चेपाटील यांना यंदाचा सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार घोषित

Ganesh Kumar Mule May 04, 2023 2:15 PM

Creative Foundation |Chandrakant Patil |   क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे  चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दिव्यांग मुलांना मदतीचा हात 
Mohan Joshi | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी जीएसटी लावू नका – मोहन जोशी
Sanitation | PMC | नालेसफाई संदर्भात मनपा प्रशासनाला इशारा !

Sajag Nagrik Manch pune | दीपक बच्चेपाटील यांना यंदाचा सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार घोषित

Sajag Nagrik Manch Pune | माहिती अधिकार कायद्याच्या (Right To Information act) प्रचार व प्रसारासाठी २००६ साली स्थापन झालेल्या सजग नागरिक मंच (Sajag Nagrik Manch) या संस्थेच्या माध्यमातून गेली १४ वर्षे महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका कार्यकर्त्याला दरवर्षी सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा चा (२०२२) पुरस्कार निगडी येथील दीपक बच्चे पाटील यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (President Vivek Velankar) यांनी दिली. (Sajag Nagrik manch pune)

दीपक बच्चेपाटील यांनी धरण सुरक्षा या विषयात देशभरात तीन हजार हून अधिक माहिती अधिकार अर्ज करून शासनाच्या धरणसुरक्षा धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे.
या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येत्या रविवारी ७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता IMDR संस्थेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार असून मध्य प्रदेशातील मुख्य माहिती आयुक्त राहुल सिंग यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. असे वेलणकर यांनी सांगितले. (Sajag nagrik manch president Vivek Velankar)