Sachin Adekar Congress | आपली खासदारकी पणाला लावून खरे बोलल्या बद्दल मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन | सचिन आडेकर
MP Medha Kulkarni – (The Karbhari News Service) – भारतीय जनता पार्टीच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आपण काल ‘ पुणे राहणार योग्य नाही ‘ असे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनावर हल्ला केला आणि संपूर्ण पुणे शहरातल्या समस्यांचा पत्रकार परिषदेमध्ये पाढा वाचलात. सर्वप्रथम मी या सर्व गोष्टींसाठी आपले अभिनंदन करतो की पुणे महापालिकेमध्ये, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपल्याच भारतीय जनता पार्टीचे सरकार होते आणि असे असताना देखील आपण खासदारकीपणाला लावून बोललात. अशी विडंबना कॉंग्रेस चे सचिन आडेकर यांनी केली आहे. (Pune News)
आडेकर म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना देखील स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्याचे वाटोळे झाले, याचा कबुली जबाबच कुलकर्णी यांनी दिला. हे सर्व आरोप पुण्यामध्ये केले. वास्तविक पाहता हे सर्व राज्यसभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर करायला हवे होते; कारण राज्यात आणि पुण्यात सत्ता मिळवण्यासाठी “मोदींच्या हात बळकट करण्यासाठी “मते मागून सत्तेत आलेले हे भारतीय जनता पार्टीचे सरकार काहीच कामाचे नाही हे आपण दाखवून दिले.
पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये मोदींचा चेहरा वापरूनच आपण आणि भारतीय जनता पार्टी मत मागणार आहात त्यामुळे पुण्याची सत्य परिस्थिती आपण फडणवीस साहेबांना व नरेंद्र जी मोदी साहेबांना सांगावी ही विनंती मते मागताना देखील याचा विचार व्हावा अशी अपेक्षा करतो.

COMMENTS