मनपा निवृत्त कर्मचार्यांना मिळणार तातडीने पेन्शन
पुणे : महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकार्यांना तातडीने तात्पुरत्या स्वरुपात दहा हजार रुपये सेवानिवृती वेतन (पेन्शन) देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, कर्मचार्यांना सेवा निवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती वेतन देणे बंधनकारक असते. मात्र सेवा पुस्तकातील नोंदी वेळच्या वेळी न केल्याने तांत्रिक कारणाने कर्मचार्यांना निवृत्ती वेतन मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे सेवकांच्या कुटुंबियांना आर्थिक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात.
रासने पुढे म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचार्यांना निवृत्तीनंतर हक्काचे पैसे मिळेपर्यंत तातडीने आणि तात्पुरती उपाययोजना म्हणून प्रतिमहिना दहा हजार रुपये पेन्शन चालू करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
COMMENTS