४५ वर्षावरील कंत्राटी कामगारांना दिलासा | कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
| पुणे महानगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला यश
45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महापालिकेतील कंत्राटी कामगारांना (PMC contract employees) दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी लक्ष घातले आहे. पालकमंत्री पाटील यांनी महापालिका प्रशासनाला आदेश दिले कि, ४५ वर्षावरील एक ही कामगार घरी बसता कामा नये. यामुळे या कामगारांना कामावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी दिली.
शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सुरक्षारक्षकांना कामावर काढून टाकण्याचा घाट पुणे महानगर पालिकेच्या प्रशासनाने नेमलेल्या कंत्राटदाराने घातला. त्यामुळे पुणे महानगर पालिकेच्या 300 पेक्षा जास्त जास्त कामगाराना घरी बसाव लागलं. याबाबत राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा चालू होता. प्रशासन या निर्णयाबाबत कुठलीही भूमिका घेत नव्हत. त्यामुळे 2 जानेवारी रोजी पुणे मनपा मुख्य गेट समोर सुरक्षा रक्षक आमरण उपोषणाला बसले होते. पुणे जिल्हा सुरक्षा मंडळ मार्फत 45 वयाची असलेली अट बेकायदेशीर आहे, याबाबत पत्र देखील महानगर पालिका प्रशासनाला दिले होते. कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे शेवटी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन संघटने मार्फत निवेदन देण्यात आले. या भेटी दरम्यान आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त बिनवडे, कुणाल खेमनार ही उपस्थित होते. पालकमंत्री यानी आयुक्तांना याबाबत आदेश दिले की कुठल्याही कामगाराला 45 वयाची अटीबाबत घरी बसू देऊ नये. त्यांना कामावर घेण्यात यावे.
संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, प्रतिनिधी विजय पांडव, बाळू दांडेकर, जान्हवी दिघे, अरविंद आगम उपस्थित होते. (Pune Municipal corporation)