PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात

HomeपुणेBreaking News

PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात

Ganesh Kumar Mule Feb 23, 2023 1:06 PM

Murlidhar Mohol on Pune Potholes | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ३० टीम तयार करून शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवा  | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश
MFDA Meeting | व्यवसायवृद्धीसाठी मिठाई, फरसाण, दुग्ध व्यावसायिकांनी संघटीत व्हावे!  | ‘एमएफडीए’च्या मेळाव्यात फिरोज नक्वी यांचे आवाहन
Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा आजपासून | सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७००१ चे बक्षीस 

पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात

| वर्ग 1 ते 3 मधील विविध 11 पदांसाठी असेल भरती

पुणे | पुणे महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात 448 पदांची भरती करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांची भरती करण्यात येणार आहे. वर्ग 1 ते 3 मधील विविध 11 पदांसाठी ही भरती असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. दरम्यान या भरती प्रक्रियेची जाहिरात 10 मार्चपर्यंत येणे अपेक्षित आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या प्रस्तावानुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका संकेतस्थळ आणि वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात येईल. राज्य सरकारच्या नियमानुसार गट ब आणि क मधील पदांसाठी ( फायरमन/ अग्निशमन विमोचन पदा व्यतिरिक्त) परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. तर अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रश्न पदवी/पदविका परीक्षेच्या दर्जासमान राहतील. प्रति प्रश्न 2. गुण प्रमाणे १०० प्रश्नांचे एकूण २०० गुणांकरिता होणाऱ्या परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे गुणांकन तक्ता तयार करण्यात आला

असून. प्रश्नपत्रिकेची संख्या – एक (प्रत्येक पदासाठी) एकूण गुण -२०० असणार आहे. तसेच नियम २ (५)(३) नुसार अग्निशमन-विमोचन / फायरमन या पदाकरिता परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ६० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असून प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. (एकुण गुण १२०) परीक्षेसाठी एकत्रितपणे ७५ मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. तसेच ८० गुणांची व्यावसायिक चाचणी (शारीरिक पडताळणी) असेल, याबाबत स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करणेत येईल.
शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS-ION (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनींमार्फत राबविणेबाबत सूचित केले आहे. शासन निर्णय  नुसार शासनाने TCS-ION (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविताना प्रति उमेदवार आकारावयाचे परीक्षा शुल्क निश्चित केले आहे. तथापि, पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील टप्पा क्र. १ मधील रिक्त ४४८ पदे भरणेची संपूर्ण प्रक्रिया IBPS संस्थेमार्फत राबविण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील
टप्पा क्र. २ मधील रिक्त ३२० पदे IBPS संस्थेमार्फत भरणे उचित ठरेल. सदर पदभरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने खुला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी र.रु. १०००/- व मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी र.रु. ९००/- परीक्षेचे प्रवेशशुल्क निश्चित करण्यात आले आहे. सदरचे प्रवेशशुल्क हे ऑनलाईन स्वीकारण्यात येणार असून, बँक ऑफ महाराष्ट्र, पी.एम.सी शाखा, (१४३०), शिवाजीनगर, पुणे येथील खाते क्रमांक ६००३९६३६६४७ वर जमा करण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
– ही असतील पदे

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) (८ पदे)
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी (२० पदे)
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) (१ पद)
४) पशु वैदयकीय अधिकारी (२ पदे)
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (२०
पदे)
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१० पदे)
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (४० पदे)
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर (३ पदे)
९) औषध निर्माता (१५ पदे)
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (१ पद),
११) अग्निशामक विमोचक / फायरमन (२०० पदे)