Rajgad | Toranagad Fort |  राजगड आणि तोरणागड येथे अत्याधुनिक रस्ते करण्याची मागणी   | माजी नगरसेविका राणी भोसले यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी

HomeBreaking Newsपुणे

Rajgad | Toranagad Fort | राजगड आणि तोरणागड येथे अत्याधुनिक रस्ते करण्याची मागणी | माजी नगरसेविका राणी भोसले यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी

Ganesh Kumar Mule Aug 12, 2023 5:27 PM

Water closure | शिवाजीनगर, कोथरूड परिसराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार 
Bhide Wada | भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती
Rajeev Gandhi Zoo : एका दिवसात तब्बल १२ हजार पर्यटकांची प्राणिसंग्रहालयाला भेट

Rajgad | Toranagad Fort |  राजगड आणि तोरणागड येथे अत्याधुनिक रस्ते करण्याची मागणी

| माजी नगरसेविका राणी भोसले यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी

Raigadh | Toranagadh | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) २५ वर्षे वास्तव्य असलेल्या किल्ले राजगड (Rajgad))व किल्ले तोरणागड (Toranagad) येथे अत्याधुनिक रस्ते मार्ग करण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका तथा शहर उपाध्यक्ष राणी भोसले (Rani Bhosale) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. (Rajgad | Toranagad)

भोसले यांनी याबाबत गडकरी यांना पत्र दिले आहे. पत्रानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन १६४७ ते १६७२ असे तब्बल २५ वर्षे किल्ले राजगड येथे वास्तव्य
होते. तसेच हिंदवी स्वराज्याचे प्रथम तोरण बांधलेला किल्ला तोरणा हा देखील शेजारीच आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा स्फूर्तीदायक इतिहास किल्ले राजगड येथे घडला आहे. सदर किल्ल्यावर अखंड हिंदुस्तानमधून तसेच महाराष्ट्रामधून शिवप्रेमी नागरिकांचा ओघ सुरु असतो. सदर किल्ल्यांवर पोहोचण्यासाठी सद्यस्थितीत खूप खराब व निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या पायाभूत सुविधा सदर ठिकाणी उपलब्ध नाहीत. (Fort Roads)

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ (मुंबई – बेंगलोर) येथून किल्ले राजगड व तोरणागड हे अंतर फक्त ३० कि.मी. आहे. सदर ३० कि.मी. अंतराचा रस्ता अत्याधुनिक पद्धतीने तयार झाला, रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण झाले तर निश्चितच संपूर्ण वेल्हे तालुका व राजगड व तोरणा किल्ला या परिसराचा कायापालट होणार आहे.
डोंगरी, दुर्गम व अतिमागास तालुका असा, जो आमच्या या ऐतिहासिक वेल्हे तालुक्याला शिक्का लागला आहे
तो निश्चित सदरच्या कार्याने पुसला जाईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र व पावन झालेल्या या शिवभूमित आपल्या माध्यमातून रस्त्याची कामे व्हावीत व सदर परिसर जगाच्या नकाशावर पुढे यावा यासाठी आपण भरघोस निधी मंजूर करून सदर रस्त्यांचा विषय मार्गी लावावा अशी आपणास नम्र विनंती आहे.

वेल्हे तालुक्यात अरुंद व निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्यामुळे दोन बस समोरासमोर आल्यास एक बस रस्त्याच्या कडेला उतरल्याशिवाय दुसरी बस मार्गस्थ होऊ शकत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चिखल
असल्यामुळे खूप मोठी कसरत करावी लागते. संपूर्ण भारत देशात आपली रस्ते विकासपुरुष म्हणून गणना केली जाते. नुकतेच आपण कापूरहोळ ते भोर तसेच शिंदेवाडी ते महाड घाट या रस्त्यांसाठी खूप मोठं निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. राष्ट्रीय महामार्ग क्र.४ (मुंबई – बेंगलोर) येथून रस्ते दुरुस्तीसाठी अंदाजे १०० कोटी
रुपये निधी पुरेसा होईल. आपले माध्यमातून सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला तर किल्ले राजगड, किल्ले तोरणागड व संपूर्ण डोंगरी व दुर्गम, अतिमागास वेल्हे तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात या रस्त्यांची कामे कामे झाल्यास संपूर्ण ग्रामीण जनतेचे जीवनमान, विद्यार्थ्यांचे शिक्षक व बेरोजगारांना रोजगार व शिवप्रेमी व दुर्गप्रेमी पर्यटकांमुळे सदर परिसराचा निश्चितच कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. असे भोसले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | Rajgad | Toranagad | Demand for modern roads in Rajgad and Tornagad | Former corporator Rani Bhosale made a demand to Nitin Gadkari