पुण्याला पावसाने झोडपले
: पुणेकरांची झाली धावपळ
पुणे: पुण्याला आज पावसाने चांगलेच झोडपन काढले. दोन दिवसाच्या प्रचंड उकाड्यानंतर आज सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह रात्री 8:30 पर्यंत पाऊस बरसत होता. शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांवर खूप पाणी साचले होते. त्यामुळे पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
: सगळीकडे पाणीच पाणी
ऑक्टोबर महिन्याची चाहूल लागताच वातावरणात उकाडा जाणवू लागला होता. रविवारी सकाळी आणि दुपारी पाऊस पडून गेल्यानंतर पावसाने उघडीप दिली दिली होती. गेले दोन दिवस प्रचंड ऊन आणि उकाडा जाणवत होता. सोमवारी देखील प्रचंड ऊन होते. मात्र 5 वाजण्याच्या सुमारास अचानक ढग भरून आले. थोड्या वेळात पावसाला सुरुवात झाली. मात्र या पावसाने कामावरून सायंकाळी घरी जाणाऱ्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. त्यांनतर पावसाचा जोर थोडा कमी झाला. मात्र 7 वाजल्यानंतर पुन्हा पाऊस कोसळू लागला. यावेळी भयानक विजा आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. 8:30 पर्यंत मोठा पाऊस बरसतहोता . या पावसाने मात्र शहरात पाणीच पाणी केले. मध्यवर्ती तसेच उपनगरातील रस्ते पाण्याने भरून गेले. पुणेकरांची गाडी चालवताना तारांबळ उडू लागली. यामुळे लोकांना कात्रज आणि धनकवडी मध्ये आलेल्या पुराची आठवण झाली. महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली होती. मात्र लोकांची ससेहोलपट होणे थांबले नाही.
COMMENTS