नगरसेवकांच्या मागणीनुसार विविध प्रभागांसाठी 80 लिटरच्या बकेटची खरेदी
: 80 लाखाचा येणार खर्च ; स्थायी समितीची मान्यता
: 2019-20 खरेदी नाही झाली
: पायल इंडस्ट्रीज ला काम
निविदेमध्ये प्राप्त झालेले दर हे निविदेच्या पूर्वगणन पत्रक 71. लक्ष पेक्षा 15.00% ने जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने मध्यवर्ती भांडार कार्यालयाने सदर निविदेमधील जास्त आलेले दर कमी करण्यासाठी मे. पायल इंडस्ट्रीज यांना 16/11/2021 रोजी पत्र दिले. त्यानुसार मे. पायल इंडस्ट्रीज यांनी सदर निविदेकरिता प्रसिध्द करण्यात आलेले दर – र.रु. 590.40 प्रती नग हा दर 2 वर्षापूर्वीचा असल्यामुळे व सद्यस्थितीत प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे भाव वाढले असल्याने दरवाढ झालेली आहे. तरी सुद्धा आमच्या संस्थेने 15% जास्त 2.50% कमी करून 12.50% जास्त दराने निविदेकामी काम करण्यास तयार असल्याचे कळविले आहे.
विषयांकित निविदा पुणे मनपाच्या सभासदांच्या मागणीनुसार राबविण्यात आलेली असून संबंधित मा.सभासद हे 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटचा पुरवठा करणेसाठी आग्रही आहेत. 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटची खरेदी केल्यास विविध प्रभागातील ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी मदत होणार आहे. मे. पायल इंडस्ट्रीज यांनी सदर निविदेकरिता 12.50% जास्त दराने निविदेकामी काम करण्यास तयार असल्याचे कळविलेनुसार मध्यवर्ती भांडार कार्यालयाने दराबाबत शहानिशा करणेकामी GeM पोर्टल या शासनमान्य संकेतस्थळावरील सद्यस्थितील 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटचे दर तपासले असता त्याचे र.रु 733/- प्रती नग असल्याचे आढळून आले. बाजारामधील 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटच्या दराचा विचार करता विषयांकित निविदेमधील प्राप्त दर बाजारभावाशी सुसंगत आहेत. सदर खरेदी कामी रक्कम रु. – 79,87,500/- ( सर्वकरांसह ) इतका खर्च येणार आहे. यासाठी सन 2021 – 22 च्या विविध मा. सभासदांची वॉर्डस्तरीय व ‘स’ यादीमधील अर्थशीर्षकावर पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. त्यानुसार याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
COMMENTS