Water Project | मोरगाव  परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी 40 दिवसांत पुर्ण 

HomeBreaking Newsपुणे

Water Project | मोरगाव  परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी 40 दिवसांत पुर्ण 

Ganesh Kumar Mule Jun 21, 2022 8:06 AM

Pune, Airport : Sharad Pawar : पुणे विमानतळाबाबत शरद पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!
ITI Training Center Yerawada | MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र
Maharashtra News | राज्यात ८१ हजार कोटींच्या सात गुंतवणुक प्रकल्पांना मंजुरी | कोकणसह मराठवाडा, विदर्भात होणार २० हजार रोजगार निर्मिती

 मोरगाव  परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी 40 दिवसांत पुर्ण

मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी अशा 40 दिवसांत पुर्ण करण्यात आले आहे. या योजनेमुळे परिसरातील लोकांना चांगलाच फायदा होणार आहे.

श्री क्षेत्र मोरगांव ता. बारामती जि.पुणे येथील जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांचे माध्यमातुन व  आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांचे सहकार्यातुन पुरंधर उपसा सिंचन योजनेमध्ये जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा होणेकामी पाइपलाइन करणेसाठी ८ मार्च रोजी 1.32 कोटी C.S.R फंडातून निधी देणेत / उपलब्ध करून दिला होता. सदर पाईपलाईनचे काम पुर्ण करणेसाठी मोरगाव येथील तरुण शेतकरी / कार्यकर्ते  अनिल ढोले, चांगदेव ढोले,गणेश ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले ,विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, विजय ढोले,नारायण तावरे, विलास तावरे महादेव ढोले ,अभिजीत ढोले तसेच मोरगाव चे विद्यमान सरपंच श्री निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष कष्ट घेतले होते. सदर योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतक-यांना फायदा होणार आहे.

सदर योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे. सदर योजनेकामी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी  संदीप शंकरराव कदम ,उपायुक्त ,पुणे महानगरपालिका यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले आहे .सदर पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ सोमेश्वर स.सा.कारखाना चेअरमन पुरूषोत्तम जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष  संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते झाले होते.

सदर काम दिनांक 18 जुन 2022 रोजी पुर्ण झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले व सर्व ग्रामस्थ यांचे उपस्थित खटकळ ओढयात पाणी सोडण्यात आले.

सदर योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच त्यांनी  अजितदादा पवार  यांचे नुकतेच मुंबई येथे जाऊन सत्कार केला व आभार व्यक्त केला आहे. तसेच सिंचन विभागातील मुख्य अभियंता गुणाले साहेब व इतर अधिकारी त्यांचेही आभार मानले आहेत.