Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) रोजी शहरातील या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) रोजी शहरातील या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Apr 11, 2025 8:10 PM

Pan-Aadhaar Link: 31 मार्चपूर्वी पॅन-आधार कार्ड जोडणे आवश्यक | हे घरबसल्या ऑनलाइन करा
Water Closure | पूर्ण शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार
Online Fraud | Devendra Fadnavis | ऑनलाइन फसवणुकीबाबत जलद प्रतिसादासाठी ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) रोजी शहरातील या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – गुरुवारी  १७ एप्रिल रोजी  रोजी आगम मंदिर येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून पाण्याची होणारी गळती थांबविणे व राजमाता भुयारी मार्ग येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करिणेकरिता काही  ठिकाणी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (PMC Water Supply Department)

तसेच शुक्रवार रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन  नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :

निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक भारती विद्यापीठ, भारती विहार, चंद्रभागानगर, सावंतविहार, सावंत गार्डन, वंडर सिटी, कदम प्लाझा, ज्ञान्सी गार्डन, माणिक मोती, नारायणी धाम परिसर, दत्तनगर, संतोषनगर, आबेगाव बुद्रुक गावठाण, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी रोड, धबाडी व परिसर इ.