Pune Shivsena Bhavan | पुण्यातील शिवसेना भवनातील गणपती समोर एकता नगरी परिसरात आलेल्या पुराचा देखावा! 

HomeFestivals

Pune Shivsena Bhavan | पुण्यातील शिवसेना भवनातील गणपती समोर एकता नगरी परिसरात आलेल्या पुराचा देखावा! 

Ganesh Kumar Mule Sep 11, 2024 5:04 PM

Pradhanmantri Matru Vandana Yojana | तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Nashik News | नाशिक शहरातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
CM Eknath Shinde | ‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Shivsena Bhavan | पुण्यातील शिवसेना भवनातील गणपती समोर एकता नगरी परिसरात आलेल्या पुराचा देखावा!

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – पुण्यातील शिवसेना भवनातील गणपती समोर एकता नगरी परिसरात आलेल्या पुराचा देखावा सादर करण्यात आला आहे. शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून हा देखावा सादर करण्यात आला आहे. (Pune Ganpati Decorations)

 

अतिमुसळधार पावसाने पुणे शहरात  पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा सगळ्यात मोठा फटका सिंहगड रोडवरील एकता नगरी परिसराला बसला होता.  भयभीत झालेल्या नागरिकांना तत्काळ मदतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणांना कार्यान्वित करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, उपायुक्त यांच्या समवेत पुणे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे घटनास्थळी पोहचले होते. तसेच एकतानगर, विठ्ठलनगर, आदर्शनगर व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाण्याचे जार, सौर बल्ब, भोजनव्यवस्था तातडीने पुरविण्यात आली होती. शिवाय मुख्यमंत्र्यांनी देखील या परिसराला भेट दिली होती.

हाच धागा पकडत प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेंतून पुण्यातील शिवसेना भवनात गणपतीला एकता नगरीचा विघ्नहर्ता असे नाव देत देखावा सादर केला आहे. यामध्ये एकता नगरीत पुराचे पाणी कसे घुसले, नागरिकांचे कसे हाल झाले, त्यांना मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कशी मदत देण्यात आली. असा सगळा देखावा चलचित्राच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. हा देखावा गणेश भक्तांचे ध्यान खेचून घेत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0