Pune RO Plants | खाजगी “RO” प्लांटसाठी पुणे महापालिकेची नवीन नियमावली! | प्लांट वरील निर्बंध उठवले

Homeadministrative

Pune RO Plants | खाजगी “RO” प्लांटसाठी पुणे महापालिकेची नवीन नियमावली! | प्लांट वरील निर्बंध उठवले

Ganesh Kumar Mule Feb 17, 2025 6:48 PM

GB Syndrome in Pune – आजपर्यंत ७२१५ घरांचे सर्वेक्षण | किरकटवाडी, धायरी परिसरातील पाणी पिण्यास योग्य असल्याचा  महापालिकेचा दावा 
GBS In Pune | GBS या साथीच्या रोगाबाबत महानगरपालिके कडून पुणेकरांना देण्यात येणारी मदत न थांबवण्याची मागणी 
Madhuri Misal on GBS | गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काय दिले निर्देश!

Pune RO Plants | खाजगी “RO” प्लांटसाठी पुणे महापालिकेची नवीन नियमावली! | प्लांट वरील निर्बंध उठवले

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका हद्दीमधील (Pune Municipal Corporation Limits) ज्या भागामध्ये जीबीएसचे (GBS) रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागातील ३० खाजगी “RO” प्लांट बंद करण्याबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune PMC) नोटीस देऊन सदर प्लांट सीलबंद करण्यात आले आहेत. हे निर्बंध महापालिकेने उठवले आहेत. तसेच महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून (PMC Water Supply Department) नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील प्रकरण १४ नियम १८ नुसार ज्यातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असेल असा कोणताही खाजगी जलप्रवाह, झरा, तलाव, विहीर, अन्य जागा, इत्यादी चांगल्या प्रकारे दुरुस्त स्थितीत ठेवण्याची किंवा सदर खोतांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. (Pune PMC News)

सद्यस्थितीत किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला, इत्यादी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने गुणात्मकदृष्ट्या योग्य दर्जाचे पाणी देणाऱ्या व विहित निकषांची पूर्तता करणाऱ्या खाजगी “RO” प्लांट्सना पुन्हा सुरु करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे.

या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत:

१. खाजगी “RO” प्लांट यांनी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खालील २ ते ५ मध्ये नमूद कागदपत्रांसह मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) यांचेकडे अर्ज करावा.

२. खाजगी “RO” प्लांट मालक यांनी तातडीने त्यांच्या मूळ उत्पादक कंपनीकडून किंवा प्लांट दुरुस्त करणारी संस्था यांचेकडून संपूर्ण “RO” प्लांटची देखभाल दुरुस्ती करून घेऊन त्याबाबतचा दाखला संबंधित कंपनीकडून घ्यावा. तसेच देखभाल दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू असतानाचे सुस्पष्ट, तारीख, वेळ व Geo Tag सह फोटो काढावेत.

३. मुख्य उत्पादक कंपनी किंवा प्लांट दुरुस्त करणारी संस्था यांचेकडून सदर प्लांटच्या आउटलेटचे पाणी WHO IS 10500 (2012) नुसार शुद्धीकरण करण्यासाठी प्लांट योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याचा दाखला सादर करावा.

४. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे / पुणे महानगरपालिका प्रयोगशाळेकडून सदर “RO” प्लांटद्वारे येणारे पाणी पिण्यास योग्य आहे अगर कसे? याबाबत तपासणी करून घेण्यात यावी व त्याप्रमाणे अहवाल त्यांचेकडून प्राप्त करून घ्यावा.

५. सदर “RO” प्लांटसाठी पुणे महानगरपालिकेचे पाणी वापर करत असल्यास सदर नळजोड नियमान्वित करून बिगर घरगुती दराने मीटरवर सदर पाण्याचे बिल
मनपाकडे भरावे.

६. संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक यांनी सदर “RO” प्लांटचे वेळोवेळी नमुने घेऊन त्यांची तपासणी करावी व पाणी पिण्यास अयोग्य आढळल्यास सदर प्लांट बंद करण्याबाबत कारवाई करावी.