Pune Property Tax | सर्व पुणेकर मिळकतधारकांना ४०% करसवलत देण्याची आमदार हेमंत रासने यांची मागणी

HomeBreaking News

Pune Property Tax | सर्व पुणेकर मिळकतधारकांना ४०% करसवलत देण्याची आमदार हेमंत रासने यांची मागणी

Ganesh Kumar Mule Jul 09, 2025 8:20 PM

PMC Election Final Ward Structure | पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर  | ८ प्रभागांची नावे बदलली | १३२९ हरकती मान्य केल्या 
Purandar Airport | पुरंदर विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- पी. वेलरासू
Illegal Hoardings | आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स | प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

Pune Property Tax | सर्व पुणेकर मिळकतधारकांना ४०% करसवलत देण्याची आमदार हेमंत रासने यांची मागणी

| जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी युडीसीपीआर नियमावलीत शिथिलता गरजेची – आमदार हेमंत रासने

 

MLA Hemant Rasane – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेकडून सध्या मूळ मालक स्वतः राहत असलेल्या मिळकतींवर ४० टक्के कर सवलत दिली जाते. मात्र, त्या मिळकतीत भाडेकरू राहत असल्यास ही सवलत रद्द केली जाते. हा दूजाभाव न करता सर्व मिळकतधारकांना सरसकट ४० टक्के करसवलत मिळावी, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभा सभागृहात केली. नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान रासने बोलत होते. (Pune Municipal Corporation Property Tax)

पुणे शहराचे गावठाण असणाऱ्या कसबा मतदारसंघात अनेक जुनेवाडे असून युडीसीपीआर नियमावलीतील एक मीटर साईड मार्जिनच्या अटींमुळे पुनर्विकासात अडथळे येत आहेत. या नियमात तातडीने शिथिलता देऊन जुन्यावाड्यांचा पुनर्विकास मार्गी लावणे गरजेचे आहे. मेट्रोच्या टीओडी झोनमधील वाहतूक आराखडा, टीडीआर प्रक्रिया, बांधकाम परवानग्या व पुनर्विकास नियम यामध्ये सुधारणा करून तातडीने एसओपी जारी करावी, अशी मागणी देखील यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात टीडीआर केवळ दोन महिन्यांत दिला जातो, तर पुण्यात त्यासाठी तब्बल दोन वर्षे लागत असल्याचे यावेळी रासने यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कसबा मतदारसंघात असणाऱ्या ४४ शासकीय वसाहतींची दुरवस्था झाली असून, निधीच्या अभावामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही यावी रासने यांनी केली.
——————–

मध्यवर्ती पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शनिवारवाडा–स्वारगेट व सारसबाग–शनिवारवाडा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून डीपीआर करण्याचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करून प्रकल्पाला गती घेण्याची मागणी यावेळी रासने यांनी केली आहे