Pune Potholes | रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल | शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा इशारा
भानगिरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे हे महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असून, आज पुणे शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून जून महिन्यात पाउस झाला नसताना, जूलै महिन्यात फक्त पंधरा दिवसात झालेल्या पावसाने हे खड्डे पडले आहेत. पावसाळापुर्व केलेल्या कामाच्या माहितीत पुणे महानगरपालिकेतर्फे, आम्ही पावसळ्यात शहरात खड्डे पडू नये म्हणून ५५ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले होते, तरी फक्त १५ दिवसाच्या पावसाने पुण्यात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे दुचाकीचे शहर असलेल्या पुण्यात, दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. दुचाकींचे अनेक अपघात होत आहेत. चारचाकी वाहनांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱ्यांना देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आपणांस विनंती आहे की, येत्या १५ दिवसात पुणे शहर खड्डेमुक्त करावे, अन्यथा कायम समाजसेवेत तत्पर असलेल्या शिवसेनेतर्फे “शिवसेना स्टाईल” आदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित घडल्यास पुणे महानगरपालिका जबाबदार असेल. असे ही निवेदनात म्हटले आहे.