Pune PMC Property Tax Amnesty Scheme | अभय योजनेच्या लाभार्थ्यांचे महापालिकेकडून गुलाबपुष्प देवून स्वागत | पहिल्या दिवशी १०५३ लोकांचा सहभाग तर ६.१५  कोटींचा महसूल 

Homeadministrative

Pune PMC Property Tax Amnesty Scheme | अभय योजनेच्या लाभार्थ्यांचे महापालिकेकडून गुलाबपुष्प देवून स्वागत | पहिल्या दिवशी १०५३ लोकांचा सहभाग तर ६.१५ कोटींचा महसूल 

Ganesh Kumar Mule Nov 15, 2025 7:13 PM

Holiday on PMC Election | १५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी किंवा विशेष सवलत | महापालिका आयुक्त यांचे परिपत्रक जारी 
Nandini Dhende | नगरसेविका नंदिनी धेंडे यांचा आंदोलनाचा इशारा; पाणी पुरवठा अधिकारी अलर्ट | प्रभाग दोन मधील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाहणी
PMC Pension Software | सेवानिवृत सेवकांची पेन्शन प्रकरणे लवकर लागणार मार्गी! |  नवीन ऑनलाईन संगणक प्रणालीचे कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

Pune PMC Property Tax Amnesty Scheme | अभय योजनेच्या लाभार्थ्यांचे महापालिकेकडून गुलाबपुष्प देवून स्वागत | पहिल्या दिवशी १०५३ लोकांचा सहभाग तर ६.१५ कोटींचा महसूल

 

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या वतीने कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मिळकतकर थकबाकी अभय योजनेची आज उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी १ हजार ५३ लोकांनी सहभाग घेतला. तर त्या माध्यमातून महापालिकेला  ६ कोटी १५  लाखांचे उत्पन्न मिळाले. दरम्यान चालू आर्थिक वर्षात महापालिकेला मिळकत कारमधून १७८८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (PMC Property Tax Abhay Yojana)

अभय योजनेमध्ये निवासी, बिगर निवासी व मोकळ्या जागा अशा सर्व जवळपास ४.८१ लाख मिळकतींच्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे . यातून महापालिकेला साडे पाच हजार कोटी मिळतील अशी अपेक्षा आहे.  या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आज मुख्य इमारत, १५ क्षेत्रीय कार्यालये व ५९ CFC सेंटर या ठिकाणी बोर्ड, बॅनर्स, रांगोळी याद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. या सर्व ठिकाणी आल्यानंतर नागरिकांना आल्हाददायक वाटावे म्हणून कर संकलन विभागामार्फत कार्यालये सजविली आहेत . येणाऱ्या सर्व नागरिकांचे विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक यांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

कर आकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार, सहाय्यक आयुक्त  अस्मिता तांबे, दिपक राऊत, सोपान वांजळे  व सर्व प्रशासन अधिकारी यांनी वेगवेगळे कार्यालय व CFC सेंटर येथे भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला.

जास्तीत जास्त नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असेआवाहन  महापालिका आयुक्त नवल किशोर राम व अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी नागरिकांना केले आहे .

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: