Pune PMC News | सुरक्षारक्षक व आरोग्य (ठेकेदाराचे) कर्मचारी कामावर न येता पगार घेतात | सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांची लाचलुचपत विभागात तक्रार देऊन चौकशी करा
| महापालिका आयुक्त यांच्याकडे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांची मागणी
PMC Security Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत काम करणारे शेकडो सुरक्षारक्षक व आरोग्य (ठेकेदाराचे) कर्मचारी कामावर न येता पगार घेतात. असा आरोप माजी नगरसेवक तथा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला आहे. तसेच रक्षा विभागातील अधिकाऱ्यांची लाचलुचपत विभागात तक्रार देऊन चौकशी करा, अशी मागणी बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
बालगुडे यांनी आयुक्पुतांना दिलेल्णेया पत्रानुसार मनपा मध्ये ठेकेदारी पद्धतीवर साधारणता आठ ते दहा हजार कामगार आहेत. सदर सुरक्षारक्षक व इतर काम करण्यासाठी महापालिका निविदा काढते व कंपनीला कामगार घेण्याचे कार्यादेश देते. मनपा संबंधित कंपनीला ठेकेदाराला रक्कम अदा करते. पुणे महानगरपालिकेने कामगार सुरक्षा रक्षक भरण्याचे आदेश दिले होते. त्या कंपनीने मनपामध्ये काम करतात असे बोगस यादी तयार केली. वास्तविक त्यातील कामगार मुंबईतच होते. त्यांना ठेकेदाराकडून पगार अदा करण्यात येत होता.
बालगुडे यांनी म्हटले आहे कि, ही केवळ पुणे मनपाची फसवणूक नसून टॅक्स भरणाऱ्या पुणेकरांच्या पैशावर दरोडा आहे. असे शेकडो सुरक्षारक्षक व आरोग्य (ठेकेदाराचे) कर्मचारी कामावर न येता पगार घेतात अशी आमची माहिती आहे. या मध्ये काही मनपा अधिकारी सुद्धा सामील असल्याचे आम्हाला संशय आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही आपणास १८-१०-२०२४ व २४-२-२०२५ रोजी निवेदन दिलेले आहे. हा सर्व प्रकार पुणेकरांच्या मनात संशय कल्लोळ तयार करणारा आहे. तरी या विषयी संबंधित सुरक्षा अधिकारी व इतर प्रमुखांची लाच लुचपत विभागात तक्रार देऊन चौकशी करावी. अशी मागणी बालगुडे यांनी केली आहे.
COMMENTS