Pune PMC News | आपले विचार हीच आपली शक्ती : डॉ राजेंद्र भारूड | महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सन्मान!
PMC Employees and Officers – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे (PMC Labour Welfare Fund) सन्मान करण्यासाठी गुणगौरव समारंभाचे आयोजन बुधवार रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र भारूड, IAS, आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रस्तावना करताना मुख्य कामगार अधिकारी, नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी कामगार कल्याण निधी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर समिती सदस्य श्री कुणाल मंडवाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी आपल्या जीवनाचे पैलू उलगडले त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केला. तसेच आपले विचार चांगले असतील तर आपण उंच शिखरावर किंवा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्या साठी कोणीही अडथळा आणू शकत नाही. आपले विचार हीच आपली शक्ती आहे सर्वांनी अभ्यास केला पाहिजे मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे आपण ध्येयवेढे व्हायला पाहिजे म्हणजे आपले भविष्य उज्वल होईल देशाची नवी पिढी घडेल व देशाचाही विकास होईल असे बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले.
तदनंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले तर आयोजनाची जबाबदारी मनीषा कायटे यांनी पार पाडली.
COMMENTS