Pune PMC News – कात्रज – कोंढवा, शिवणे – खराडी रस्त्याबाबत महापालिका आयुक्त यांचे महत्वाचे निर्देश
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – वाहतूक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेकडील भूसंपादन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मा.महापालिका आयुक्त नवल किशोर राम व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यापुर्वी ८ जुलै रोजी संयुक्त बैठक घेऊन शहरातील वाहतूक सुधारणा आणि इतर महत्वाच्या प्रकल्पांचे भूसंपादन वेगाने पूर्ण करण्यासाठी मोजणी व नकाशे तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने भूसंपादन प्रकल्पांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये खालील प्रमाणे चर्चा होऊन निर्देश देण्यात आले. (Pune Road)
१. कात्रज-कोंढवा रस्त्याचे चालू असलेल्या तीन भूसंपादन प्रकल्पांपैकी पहिल्या टप्प्यात ५० मी. रुंदीच्या रस्त्याचे भूसंपादनासाठी आवश्यक असणारी रक्कम उपलब्ध करुन सदरचे भूसंपादन दोन महिन्यामध्ये पुर्ण करण्याबाबत निर्देश दिले.
२. कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूसंपादनासाठी आवश्यक असणारा निधी पथ विभाग, भूसंपादन विभाग यांचे समवेत चर्चा करुन उपलब्ध करुन देणेबाबत मा.महापालिका आयुक्त यांनी सह महा.आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना निर्देश दिले.
३. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वाचे असणारे मिसिंग लिंकच्या भूसंपादनासाठी लागणारी रक्कम तसेच प्रत्यक्षात रस्ता करण्यासाठी लागू शकणारा कालावधी विचारात घेऊन पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात करण्यासाठीचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश पथ विभाग व भूसंपादन विभाग यांना महापालिका आयुक्त यांनी दिले.
४. वाकड ते बालेवाडी यांना जोडणा-या पुलापासून बालेवाडी पर्यंतचा रस्ता, पुणे पेठ वडगाव बु. सिंहगड रोड सनसिटी ते कर्वेनगर पुलाला जोडणारा रस्ता, कर्वेनगर महालक्ष्मी लॉन्स ते जावळकर उद्यान रस्ता, कर्वे पुतळा पेट्रोल पंप ते मिलन कॉलनी पर्यंतचा रस्ता व इतर डी.पी. रस्ते व मिसिंग लिंक यांचे उपयुक्ततेनुसार प्राधान्यक्रम ठरवून त्याची यादी तयार करावी.
५. ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये सुचना दिल्याप्रमाणे भूसंपादन प्रकल्पासाठी आवश्यक असणारे संयुक्त मोजणी नकाशे पुणे महागनरपालिकेला मिळाले बाबत आढावा घेण्यात आला व निर्देश दिल्यानुसार सर्व संयुक्त मोजणी नकाशे प्राप्त झाल्याने त्यावर समाधान व्यक्त केले.
६. शिवणे खराडी रस्त्याच्या ताब्यात आलेल्या मिळकती बगळुन आवश्यक असणा-या भागाचे भूसंपादन करणेसाठी पथ विभाग, भूसंपादन विभाग यांनी एकत्रित नियोजन आराखडा तयार करणेकरिता निर्देश दिले.
७. बांधकाम विभागाकडे प्राप्त होणा-या टि.डी.आर. प्रकरणांपैकी रस्त्यासाठी आवश्यक असणारी टि.डी.आर प्रकरणे प्राधान्याने फास्ट ट्रॅकद्वारे मंजूर करण्याचे निर्देश मा. महापालिका आयुक्त यांनी दिले.
८. ज्या भूसंपादन प्रकरणांचे अंतिम निवाडे मंजुरीसाठी आहे ते पुढील आठ दिवसांत सादर करणेबाबत विशेष भूसंपादन अधिकारी क्र. १५ व १६ यांना जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले.
९. प्राधान्यक्रम ठरवून उदिष्टे समोर ठेवून काम करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी दिले.

COMMENTS