Pune PMC News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा समूह अपघात विमा!    | महापालिका आयुक्तांचा निर्णय

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा समूह अपघात विमा! | महापालिका आयुक्तांचा निर्णय

Ganesh Kumar Mule Nov 27, 2024 7:43 PM

DCM Ajit Pawar on Pune Rain | पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार | अजित पवार
Rain in Dhanori | महापालिका आयुक्तांकडून धानोरी भागातील नाले आणि पावसाळी लाईनची पाहणी!
Vikram Kumar IAS | Dr Rajendra Bhosale IAS | अखेर विक्रम कुमार यांची बदली | डॉ राजेंद्र भोसले पुणे महापालिकेचे नवे आयुक्त

Pune PMC News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा समूह अपघात विमा!

| महापालिका आयुक्तांचा निर्णय

 

PMC Accident Insurance | (The Karbhari News Service) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation -) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC Group Accident Insurance Scheme) चालवली जाते. पूर्वी कर्मचाऱ्याकडून 136 रुपये घेऊन 10 लाखाचा विमा उतरवला जायचा. मात्र मागील वर्षी रक्कम वाढवली होती. मात्र यात दुजाभाव केला असल्याची कर्मचाऱ्यांची भावना होती. कारण वर्ग-१ साठी २५ लाख, वर्ग-२ साठी २० लाख, वर्ग-३ व ४ साठी १५ लाख इतका विमा असेल. 3-4 वर्गातील कर्मचाऱ्यांनाच याची खरी गरज असते. असे असतानाही त्यांनाच कमी रक्कम ठेवली होती. योजना ही कर्मचाऱ्यांसाठी आहे कि विमा कंपनीच्या लाभासाठी असाही प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता आणि कर्मचाऱ्यांनी नाराजी दर्शवत यात समानता आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार १ ते ४ वर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा विमा असणार आहे. त्यासाठी अवघ्या ४४७ रुपयांची कपात केली जाणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहेत. (PMC Accident Insurance)

– सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू योजना

महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागात अनेक कर्मचारी (PMC Pune Employees) काम करतात. जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना (PMC Services) दिल्या जातात. आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता. परंतु 2016-17 पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे. कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात. यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत. अशा कामगारांना पालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे. अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना 10 लाखांचा विमा मिळत होता. जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा 100 टक्के लाभ दिला जातो. कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळ आहे. पालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ १३६ रुपये द्यावे लागत होते. महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. (PMC Accident Insurance News)

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या पगारातून ४४७ रुपये इतकी रक्कम कपात केली जाणार आहे. वर्गणी कपात करण्याची जबाबदारी बिल लेखनिक याच्यावर असणार आहे. वर्गणी कपात न करणे, कमी कपात करणे, अशा गोष्टी झाल्यास बिल लेखनिकावर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त यांनी दिला आहे.
—-

अपघात विमा बाबत पी एम सी युनियन च्या पाठपुराव्याला यश आले असून एकसमान काम करणाऱ्या सेवकांना अपघात विमा वर्ग ३/४ लां १५ लाख व वर्ग १/२ ला २५ लाख असा अन्याय केला होता. त्यावर युनियन अध्यक्ष यानी आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरून सरसकट १५ लाख वरुन २५ लाख रुपय आता प्रशासनाने केला आहे. त्या बद्दल आयुक्त , कामगार कल्याण अधिकारी तसेच युनियन अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे जाहीर आभार.

बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एंप्लोईज युनियन

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0