Pune PMC News | निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ | प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
PMC Security Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) विविध क्षेत्रिय कार्यालये, आरोग्य केंद्रे (दवाखाने), जलकेंद्रे, सांस्कृतीक केंद्रे, क्रीडांगणे, स्मशानभुमी, मंडई, माध्यमिक विदयालये, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी शुध्दीकरण केंद्र, उदयाने वस्तीगृह इत्यादी ठिकाणी बहुउददेशीय कामगार पुरवले जातात. मागील वर्षी विविध तीन कंपन्यांचे कामगार घेण्यात आले होते. त्याची मुदत डिसेंबर २०२४ ला संपली आहे. नवीन वर्षात नवीन निविदा प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने यात कसूर केल्याचे दिसून आले. निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आता त्याच कंपन्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आणला होता. त्याला नुकतीच स्थायी समितीत (PMC Standing Committee) मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (PMC Civic body)
पुणे महापालिकेत हा आता नवीनच प्रकार सुरू झाला आहे. एखाद्या कामाची मुदत कधी संपणार आहे, हे प्रशासनाला माहीत असते. त्यानुसार आधीच निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र असे केले जात नाही. ऐन वेळेला प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया पूर्ण झाली नाही म्हणून मुदतवाढ घेऊन जुन्याच लोकांना काम दिले जाते. पूर्वी लोकप्रतिनिधी अशा गोष्टीकडे लक्ष देऊन या बाबतचा मुद्दा उपस्थित करत असत. मात्र आता सगळाच मनमानी कारभार सुरू झाला आहे. शिवाय आता हा पायंडच पडला आहे. यामुळे त्याची गंभीरता देखील कमी झाली आहे.
सुरक्षा विभागाकडून या बाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत पुणे शहरातील महानगरपालिका अंतर्गत विविध क्षेत्रिय कार्यालये, उदयाने, आरोग्य केंद्रे (दवाखाने), जलकेंद्रे (पंपिंग स्टेशन, पाणी टाकी), माध्यमिक विदयालये, सांस्कृतीक केंद्रे, क्रीडांगणे, जलतरण तलाव, स्मशानभुमी, मंडई, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी शुध्दीकरण केंद्र, व बहुउददेशीय (माजी सैनिक), अतिक्रमाण कोठी इत्यादी ठिकाणी सुरक्षा विषयक कामासाठी सुरक्षा रक्षक, माजी सैनिक पथक व बहुउददेशीय कामगार पुरविण्यात येतात.
स्थायी समिती ठ.क्र.१८७८, १२/०३/२०२४ अन्वये मान्यता घेऊन सुरक्षा विभागामार्फत २०२३/०१ निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार पात्र निविदाधारक सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरीटी प्रा.लि., इगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सोनल सर्व्हिसेस व सिंघ इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरीटी प्रा. लि. यांना प्रत्येकी अनुक्रमे ६२६, ६२६, ३१३ प्रमाणे विभागून असे एकुण १५६५ बहुउददेशीय कामगार पुरविणे बाबत कार्यादेश देण्यात आलेले होते.
प्रस्तावात नमूद केले आहे की, जानेवारी, २०२४ ते माहे ऑक्टोबर, २०२४ पर्यंत सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरीटी प्रा.लि., इगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सोनल सर्व्हिसेस व सिंघ इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरीटी प्रा. लि. यांचे महिनेमाहे बिलासाठी रक्कम २५.१९ कोटी खर्च करणेत आले आहेत व निविदा संपेपर्यत डिसेंबर २०२४ अखेर बिलांसाठी अंदाजे रक्कम १६.२९ कोटी खर्च झाला आहे. तसेच जानेवारी, २०२५ ते मार्च-२०२५ अखेर रक्कम ११.८२/-कोटी खर्च होणार आहेत.. त्यामुळे मार्च-२०२५ अखेर सुरक्षा विभागास पुरेशी तरतुद उपलब्ध राहणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. असे म्हटले आहे.
निविदा क्रमांक २०२३/०१ ची मुदत ३१/१२/२०२४ रोजी संपलेली असुन व नविन निविदा क्रमांक २०२५/०१ ची प्रक्रिया पुर्ण झाली नसल्याने १/०१/२०२५ पासुन नविन वर्क ऑर्डर देईपर्यंत इगल सिक्युरीटी सर्व्हिसेस प्रा.लि., सैनिक इंटेलिजन्स ॲन्ड सिक्युरीटी प्रा.लि. व सिंघ इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरीटी प्रा.लि.या संस्थेसमवेत करारनामा करुन काम करुन घेण्याची मागणी प्रस्तावा मार्फत करण्यात आली होती. त्याला समितीने मान्यता दिली आहे.
COMMENTS