Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुका २७ फेब्रुवारीला 

Homeadministrative

Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुका २७ फेब्रुवारीला 

Ganesh Kumar Mule Feb 20, 2026 7:11 PM

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण | जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन
Sinhgad Road Flyover | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण
Maharashtra Vidhansabha Election | २३ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात परिवर्तन दिवस !- मोहन जोशी

Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुका २७ फेब्रुवारीला

| २३ फेब्रुवारीला अर्ज भरले जाणार

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती व नाव समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी २३ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ६ अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी २३ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतर आता विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यासाठी ही निवडणूक होणार आहे.

 

त्यानुसार  अध्यक्ष व उपाध्यक्ष  यांची निवडणूक विभागीय आयुक्त यांचे आदेशानुसार शुक्रवार  २७ फेब्रुवारी  रोजी होणार आहे.

अशा होतील निवडणुका

विधी समिती | सकाळी ११:३०

शहर सुधारणा समिती | सकाळी १२:००

महिला व बाल कल्याण समिती | दुपारी १२:३०

क्रीडा समिती | दुपारी १:००

शिक्षण समिती | दुपारी १:३०

नाव समिती | दुपारी २:००

 

या समित्यांच्या बैठकीत या निवडणुका होतील.  यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून  दीपा मुधोळ-मुंढे, आयुक्त समाजकल्याण विभाग, पुणे यांची नेमणूक केली आहे.

यासाठी नामनिर्देशित पत्र स्विकारण्याचा दिवस सोमवार २३ फेब्रुवारी रोजी वेळ दुपारी ३:०० ते ६:०० वाजता निश्चित करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: