Pune PMC News | पुणे महापालिकेत मनुष्यबळ पुरवण्याच्या कामात गैरकारभार झाल्याचा आरोप! | ठेकेदारांची चौकशी करण्याची मुख्य कामगार अधिकारी यांच्याकडे मागणी
PMC Contract Employees – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत मनुष्यबळ पुरवण्याच्या कामात गैरकारभार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रुपेश केसेकर यांनी केली आहे. तसेच संबधित ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी केसेकर यांनी मुख्य कामगार अधिकारी यांच्याकडे केली आहे.
केसेकर यांनी दिलेल्या निवेदन नुसार सरकारने वेळोवेळी योग्य प्रमाणात कामगार भारती केली नसल्याने मुळातच पुणे मनपा अथवा इतर शासकीय संस्थांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाहीत. सामजिक जाणीवेतून उपेक्षित घटकातील कुशल, अकुशल नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावेत, यासाठीच सर्व शासकीय योजना राबविल्या जातात व त्याद्वारे सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसारच पुणे मनपाच्या विद्युत विभागातील काही कामासाठी कुशल अकुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून काही ठेकेदारांची नेमणुक करण्यात आलेली होती / आहे. त्यासंबंधी मी वेळोवेळी विविध अर्जाद्वारे माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु विदयुत विभागाकडून योग्य माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याने माझ्या प्रयत्नांना अडथळा होत आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीचे अवलोकन केले असता, त्यातून आढळून आलेल्या त्रुटीबाबत मी तक्रार दाखल केली होती, ज्यावर आजतागायत पुणे मनपा आयुक्तांच्या कडून
काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीची पडताळणी करतेवेळी काही बोगस कामगारांची माहिती मला उपलब्ध झाली असल्याने मी पुणे मनपा आयुक्त यांचे कडे तक्रार दाखल केली आहे. पुणे मनपा विद्युत विभागकडे कुशल, अर्धकुशल, अकुशल मनुष्यबळ पुरविण्याचे काम करणाऱ्या तसेच मागील १० वर्षात सदर काम केलेल्या ठेकेदारांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यांचेकडे काम करणाऱ्या / काम केलेल्या कामगारांना योग्य वेतन व इतर सर्व आर्थिक,
बिगर आर्थिक / समाजिक लाभ योग्य रीतीने मिळाले आहेत अगर कसे याबाबत खातरजमा करण्यात यावी. माझ्या तपासात आढळून आलेल्या बोगस कामगारांवर व त्यांना बोगस पद्धतीने पुणे मनपाच्या सेवेत कार्यरत असल्याचे दाखवणाऱ्या ठेकेदारांवर प्रचलित / लागू असणाऱ्या कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. पुणे मनपाच्या सर्व विभागातील कुशल, अर्धकुशल, अकुशल मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडील कामगारांची चौकशी करण्यात यावे. अशी मागणी केसेकर यांनी केली आहे.
COMMENTS