Pune PMC News | जंगली महाराज रोड व फर्ग्युसन रोडवर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई!
PMC Encroachment Action – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम परवाना विभागाने जंगली महाराज रस्ता व नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर धडक कारवाई केली. यात अंदाजे 18 ते 20 हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
संपूर्ण जंगली महाराज रस्ता तसेच गोखले रस्त्याच्या काही भागात ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त सोमनाथ बनकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर, सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त डॉ. रमेश शेलार व डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
यात फ्रंट व साइड मार्जिन, पदपथांवरील अतिक्रमणे, साईन बोर्ड्स, अनधिकृत स्टॉल, टपऱ्या व बांधकामे यावर कारवाई करण्यात आली. यात सिलिंडर, टपऱ्या, खुर्च्या, टेबल, कपाटे, काउंटर आदी साहित्य जप्त केले गेले.


COMMENTS